Lokmat Sakhi >Social Viral > ऐकावं ते नवलच! भाड्याने मिळतात सुंदर गर्लफ्रेंड; डेटवरच नाही तर फॅमिली फंक्शनलाही येतील आनंदाने

ऐकावं ते नवलच! भाड्याने मिळतात सुंदर गर्लफ्रेंड; डेटवरच नाही तर फॅमिली फंक्शनलाही येतील आनंदाने

काही देशांमध्ये तुम्ही चक्क गर्लफ्रेंड भाड्याने घेऊ शकता. इतकंच नाही तर या देशांमध्ये यासाठी वेगळा ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा एप्स देखील तयार केले गेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:19 IST2025-07-09T15:19:27+5:302025-07-09T15:19:59+5:30

काही देशांमध्ये तुम्ही चक्क गर्लफ्रेंड भाड्याने घेऊ शकता. इतकंच नाही तर या देशांमध्ये यासाठी वेगळा ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा एप्स देखील तयार केले गेले आहेत.

rent girlfriend here you can get beautiful girlfriends on rent from date to attending family functions | ऐकावं ते नवलच! भाड्याने मिळतात सुंदर गर्लफ्रेंड; डेटवरच नाही तर फॅमिली फंक्शनलाही येतील आनंदाने

ऐकावं ते नवलच! भाड्याने मिळतात सुंदर गर्लफ्रेंड; डेटवरच नाही तर फॅमिली फंक्शनलाही येतील आनंदाने

आजच्या काळात जग वेगाने बदलत आहे. विशेषतः प्रेम, रिलेशनशिपबद्दल नवनवीन ट्रेंड समोर येत आहेत, असाच एक हटके ट्रेंडबद्दल समोर आला आहे जो समजल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. काही देशांमध्ये तुम्ही चक्क गर्लफ्रेंड भाड्याने घेऊ शकता. इतकंच नाही तर या देशांमध्ये यासाठी वेगळा ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा एप्स देखील तयार केले गेले आहेत.

'या' देशांमध्ये भाड्याने मिळतात गर्लफ्रेंड

गर्लफ्रेंड भाड्याने मिळण्याची ही अनोखी संकल्पना जपानपासून सुरू झाली होती, परंतु आता ती चीन, थायलंड आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई देशांमध्ये खूप प्रसिद्ध आणि सामान्य झाली आहे. तसेच या देशांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या एप्सद्वारे तुमच्या आवडीनुसार गर्लफ्रेंड भाड्याने बुक करू शकता. या गर्लफ्रेंड पूर्णपणे प्रोफेशनल  आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत तुमचा वेळ घालवू शकता. 

'रेंट-ए-गर्लफ्रेंड' सिस्टम कशी कार्य करते?

जपानमधील काही कंपन्यांनी ही सेवा सुरू केली आहे. या कंपन्या  प्रोफेशनल गर्ल्सना ट्रेन करतात, ज्या त्यांच्या ग्राहकांसोबत वेळ घालवतात. तुम्हाला फक्त सोशल इंटरॅक्शन सुविधा दिली जाईल. म्हणजेच या गर्लफ्रेंडचं काम ग्राहकांसोबत डिनर डेटवर जाणं, चित्रपट पाहणं, खरेदी करणं, कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं, प्रवास करणं किंवा गप्पा मारणं इतकं मर्यादित आहे.

कशी बुक करायची गर्लफ्रेंड?

ग्राहकाला थेट एपवर जावं लागेल. यानंतर तुम्ही या प्रोफेशनल गर्ल्सचे फोटो, सवयी, आवडी-निवडी आणि भाषेच्या आधारे स्वतःसाठी गर्लफ्रेंड निवडू शकता. यानंतर तुम्ही टाइम स्लॉट बुक करू शकता. मुली नियोजित वेळी क्लायंटला भेटतात.

जर तुम्ही भाड्याने गर्लफ्रेंड बुक केली तर भाडं मुलीच्या अनुभवानुसार आणि तुम्ही गर्लफ्रेंडला कोणत्या उद्देशाने बुक करत आहात (जसे की डेटवर जाणं, कुटुंबाला भेटणं किंवा फक्त गप्पा मारणं) त्यानुसार ठरवलं जातं. जपानमध्ये प्रोफेशनल गर्ल्सना साधारणपणे १ तासासाठी ४,००० येन  २५०८.८० रुपये) ते १०,००० येन (६,२७३ रुपये) पर्यंत भाडं आकारलं जातं. तर संपूर्ण दिवसासाठी ३०,००० ते ५०,००० येन पर्यंत भाडं द्यावं लागते. प्रवास, जेवण, चित्रपटाचं तिकिट यासारख्या सुविधांसाठी ग्राहकांना वेगळे पैसे द्यावे लागतात.
 

Web Title: rent girlfriend here you can get beautiful girlfriends on rent from date to attending family functions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.