धुरंधर चित्रपट आला तेव्हा त्यातील गाणी चित्रपटापेक्षा जास्त व्हायरल झाली. चित्रपटात काही जुनी गाणी वारली गेली होती. नव्या गाण्यांपेक्षा ती जुनी गाणी इंस्टाग्रामवर सगळ्यांच्याच पोस्ट आणि स्टोरीला दिसायला लागली. अनेक वर्षांनंतर रंबा हो हे गाणं पुन्हा लोकांच्या ओठांवर आलं आणि त्या गाण्याची क्रेझ एवढी वाढली की अनेकांनी त्यावर रिल्स केले आणि मिलियनमध्ये लाईक्स मिळवले. मात्र ट्रेंड विनर ठरल्या त्या कल्पना अय्यरच. बिनधास्त आणि बोल्ड अशी मॉडेल/ डान्सर जिने काही ठराविकच गाणी - चित्रपट केले मात्र सगळीच गाणी सुपरहिट ठरली. ८० - ९०च्या दशकात हॉट आणि बोल्ड गाणी बिनधास्त करणाऱ्या काही ठराविक अभिनेत्री होत्या त्यापैकी एक नाव म्हणजे कल्पना अय्यर.
कल्पना अय्यर यांचा जन्म २६ जुलै १९५६ रोजी मुंबईत झाला. त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि रंगभूमीची आवड होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली ती १९७८ साली, जेव्हा त्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत पहिल्या रनर-अप ठरल्या. याच वर्षी त्यांनी मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत टॉप १५ मध्ये स्थान मिळवले. या यशामुळे त्यांच्यासाठी मॉडेलिंग आणि चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. मॉडेलिंगनंतर कल्पना अय्यर यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि लवकरच त्या डान्स नंबरसाठी ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांची नृत्यशैली त्या काळात वेगळी आणि लक्षवेधी होती ठरली. आत्मविश्वासपूर्ण स्टेज प्रेझेन्स हे त्यांचे वैशिष्ट्य होते. 'हरी ओम हरी', 'रंभा हो' ही दोन गाणी तर चांगलीच लोकप्रिय ठरली. १९९० नंतर त्यांनी दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले. मात्र गाणी, चित्रपट आणि मालिकाही काही ठराविकच करुन नंतर वैयक्तिक आयुष्य शांततेत घालवायचा निर्णय घेत त्या दुबईत स्थायिक झाल्या.
आता या सौंदर्यवतीने सत्तरी गाठली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात कल्पना अय्यर यांनी पुन्हा एकदा रंबा हो या गाण्यावर डान्स केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला. साडी नेसून या वयातही त्यांनी जबरदस्त सादरीकरण करत सगळ्यांचे मन जिंकले. व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की विविध फेमस पेजेसने तो रिपोस्ट केला आणि त्यावर मिलियन्समध्ये लाईक्स आले. लोकांनी कमेंट्स करत एवढे प्रेम दिले की कल्पना अय्यर यांनी अनेक पेजेसवर "मला पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटलं, तुमच्या प्रेमासाठी आभारी आहे" अशी कमेंट करत भावना व्यक्त केल्या .
Web Summary : Kalpana Iyer, the original 'Ramba Ho' dancer, stunned fans with a viral video. At 70, she recreated her iconic dance, sparking nostalgia and earning millions of likes. Her performance reminded everyone of her charm.
Web Summary : कल्पना अय्यर, 'रंभा हो' की मूल नर्तकी, ने एक वायरल वीडियो से प्रशंसकों को चौंका दिया। 70 साल की उम्र में, उन्होंने अपने प्रतिष्ठित नृत्य को फिर से बनाया, जिससे पुरानी यादें ताजा हो गईं और लाखों लाइक्स मिले। उनके प्रदर्शन ने सभी को उनके आकर्षण की याद दिला दी।