देशाला सक्षम करायचे असेल तर सगळ्यात आधी देशातील लोकांना, तरुणांना सक्षम करणे गरजेचे आहे. देशाच्या प्रगतीमध्ये देशवासियांची शारिरीक सक्षमताही अतिशय महत्त्वाची आहे. कारण आरोग्य उत्तम असेल तर वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देणे सहजशक्य आहे. म्हणूनच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. काही दिवसांपुर्वी झालेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी स्थुलता टाळण्यासाठी आहारातले तेलाचे प्रमाण कमी करावे तसेच नियमितपणे व्यायाम करावा, असे सुचविले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी मखाना खाण्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे. ते म्हणतात की मखाना हे खऱ्या अर्थाने सुपरफूड असून ते सुद्धा ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस तर नक्कीच नाश्त्यामध्ये मखाना खातात.(Prime Minister Narendra Modi Explains Benefits Of Eating Makhana)
मखाना खाण्याचे फायदे
१. मखानामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी मखाना खाणे अतिशय फायदेशीर ठरते. असं म्हणतात की जवळपास १०० ग्रॅम मखानामधून ६० मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते.
उपवास करता पण नंतर डोकं जड पडतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- त्रास होणार नाही
२. मखान्यांमध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते तर सोडियमचे प्रमाण बरेच कमी असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मखाना खाणे फायदेशीर ठरते.
३. शांत झोप येण्यासाठीही मखाना खाणे फायदेशीर ठरते. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी नियमितपणे मखाना खावे.
कोमट पाण्यात 'हा' पदार्थ घालून प्या, चेहऱ्यावर येईल तेज- कॉस्मेटिक्सची गरजच उरणार नाही
४. मखानांमधून फॉलिक ॲसिड, झिंक आणि लोहदेखील पुरेशा प्रमाणात मिळते. त्यामुळे अशक्तपणा कमी करण्यासाठी मखाना खाणे फायदेशीर ठरते.
५. वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही मखाना खाणे फायदेशीर ठरते कारण त्यातून खूपच कमी कॅलरी पोटात जातात.