Lokmat Sakhi >Social Viral > "मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड

"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड

एक मजेशीर व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. एक चिमुकली ढसाढसा रडत आहे आणि यापुढे कधीही फोन वापरणार नाही. मला माफ करा असं म्हणत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 18:20 IST2025-08-03T18:18:43+5:302025-08-03T18:20:54+5:30

एक मजेशीर व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. एक चिमुकली ढसाढसा रडत आहे आणि यापुढे कधीही फोन वापरणार नाही. मला माफ करा असं म्हणत आहे.

parents got their daughter rid of phone addiction by applying kajal in her eyes video goes viral | "मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड

"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड

लहान मुलांना जर स्मार्टफोनचं व्यसन लागलं तर ते सोडणं जवळजवळ अशक्य आहे. यासंबंधी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. एक चिमुकली ढसाढसा रडत आहे आणि यापुढे कधीही फोन वापरणार नाही. मला माफ करा असं म्हणत आहे.

व्हि़डीओमध्ये एक लहान मुलगी मोठमोठ्याने रडत आहे, कारण तिला वाटतं की, फोन वापरल्यामुळे तिच्या डोळ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पण खरं तर हे सर्व मुलीच्या पालकांनीच विचारपूर्वक केलं. त्यांनी हा जुगाड केला होता जेणेकरून मुलगी घाबरेल आणि फोनपासून दूर राहील. मुलगी रात्री झोपल्यावर पालकांनी तिच्या डोळ्यांना खूप काजळ लावलं, त्यानंतर मुलीला सांगण्यात आलं की, फोन पाहिल्यामुळे तुझ्या डोळ्यात किडे पडले आहेत आणि आता तुला डॉक्टरांना भेटावं लागेल. 


मुलीने आरशात तिचा चेहरा पाहिल्यावर ती जोरात रडू लागली. पालक मुलीला विचारत आहेत, मला सांग, तू आता फोन वापरशील का? अल्लाहला सांग मी आता फोन वापरणार नाही, कृपया मला बरं कर. त्यानंतर निष्पाप मुलगी कृपया मला बरं कर, मी आता फोन वापरणार नाही असं म्हणते. पालक तिला वारंवार घाबरवत आहेत की, फोन पाहिल्यामुळेच तुझ्या डोळ्यात किडे पडले आहेत आणि आता तुला डॉक्टरांकडेच जावं लागेल. 

Shumail Qureshi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाईक देखील केलं आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने मुलांना फोनपासून दूर ठेवलं पाहिजे आणि पालकांनी बरोबर केलं असं म्हटलं आहे. 

Web Title: parents got their daughter rid of phone addiction by applying kajal in her eyes video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.