lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > इंग्रजीतून सांगितली सत्यनारायणाची कथा! फाडफाड इंग्रजीत बोलत पूजा सांगणाऱ्या गुरुजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल

इंग्रजीतून सांगितली सत्यनारायणाची कथा! फाडफाड इंग्रजीत बोलत पूजा सांगणाऱ्या गुरुजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Satyanarayan Katha In English: काळानुसार प्रथा, परंपरा यात कसा बदल होत जातो, याचं हे एक मस्त उदाहरण.. सध्या सत्यनारायणाची कथा इंग्रजीमध्ये सांगणाऱ्या या गुरुजींचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 04:37 PM2022-08-16T16:37:09+5:302022-08-16T16:37:34+5:30

Satyanarayan Katha In English: काळानुसार प्रथा, परंपरा यात कसा बदल होत जातो, याचं हे एक मस्त उदाहरण.. सध्या सत्यनारायणाची कथा इंग्रजीमध्ये सांगणाऱ्या या गुरुजींचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे.

Panditji telling Satyanarayan Katha in English, Viral video on social media | इंग्रजीतून सांगितली सत्यनारायणाची कथा! फाडफाड इंग्रजीत बोलत पूजा सांगणाऱ्या गुरुजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल

इंग्रजीतून सांगितली सत्यनारायणाची कथा! फाडफाड इंग्रजीत बोलत पूजा सांगणाऱ्या गुरुजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Highlightsहे गुरुजी सत्यनारायणाची कथा थेट अस्खलित इंग्रजीतून सांगत आहेत. त्यामुळेच तर ते सोशल मिडियावर कौतूकाचा विषय ठरले असून त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

श्रावण महिना (Shravan) हा धार्मिक कार्यक्रमांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच तर श्रावणात प्रत्येक दिवशी काही ना काही धार्मिक कार्यक्रम, पूजा, प्रार्थना केल्या जातात. श्रावणी सोमवार, मंगळागौरी, श्रावणी शनिवार, शुक्रवारचं व्रत हे तर सगळं श्रावणात केलं जातंच. पण त्यासोबतच श्रावणात अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा (how to do satyanarayan pooja?) घातली जाते. आता अशीच एक सत्यनारायणाची पूजा एका घरी घातली गेली आणि तिच्यातल्या वेगळेपणामुळे (Panditji telling Satyanarayan Katha in English) ती सोशल मिडियावर भन्नाट व्हायरलही झाली. या अनोख्या पुजेचा हा व्हिडिओ एकदा बघायलाच पाहिजे.(viral video of satyanarayan pooja) 

 

@KulwantJanjue या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे, त्यावरून पुजेला बसलेलं ते सगळं कुटूंब दक्षिण भारतीय असावं, असं वाटतं. पण घराच्या रचनेवरून पुजा नेमकी भारतात सांगण्यात येत आहे, की ते परदेशात राहणारे भारतीय आहेत, हे मात्र लक्षात येत नाहीये. पण या सगळ्यांपेक्षाही जास्त भाव खाऊन जातात ते पूजा सांगणारे गुरुजी. कारण हे गुरुजी सत्यनारायणाची कथा थेट अस्खलित इंग्रजीतून सांगत आहेत. त्यामुळेच तर ते सोशल मिडियावर कौतूकाचा विषय ठरले असून त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 

 

पुर्वी या सगळ्या कथा संस्कृतमध्ये असत. पण भाषा बदलली, संस्कृत जाणणारे हळूहळू कमी होऊ लागले. त्यामुळे मग मराठी, हिंदी अशा भाषांमध्ये सत्यनारायण कथा येऊ लागली. पण आता परदेशात राहणारी भारतीय वंशाची पुढची पिढी अतिशय जुजबी हिंदी जाणणारी आहे. मग पुजेमध्ये नेमका काय संदेश दिला आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्यांना येणाऱ्या भाषेतून पुजेचा अर्थ त्यांना समजावून सांगणं गरजेचंच आहे. त्यामुळेच तर भाषेपेक्षा श्रद्धा आणि भावना महत्त्वाची आहे, असं अनेक नेटकरींना वाटत आहे. 


 

Web Title: Panditji telling Satyanarayan Katha in English, Viral video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.