Lead Poisoning From Pressure Cooker : किचनमध्ये अशी भरपूर भांडी असतात, ज्यांचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. पातेले, तवा, ताट, ग्लास यांच्यासोबतच बरेच लोक प्रेशर कुकरही लगेच बदलत नाहीत. पण जास्त काळ भांड्यांचा वापर करणंही घातक ठरू शकतं. याचंच उदाहरण असलेली घटना अलिकडेच समोर आली. एक व्यक्ती अनेक वर्षांपासून एकाच प्रेशर कुकरचा वापर करत होती. हा कुकर खूप जुना आणि आतून घासला गेला होता. व्यक्तीला काही महिन्यांपासून सतत पोटात वेदना, थकवा आणि स्नायूंमध्ये कमजोरी जाणवत होती. सुरूवातीला डॉक्टरांना याचं काही ठोस कारण समजलं नाही. पण जेव्हा सविस्तर टेस्ट केल्या तेव्हा समजलं की, त्याच्या शरीरात शिस्याचे (Lead) प्रमाण खूप जास्त वाढलं आहे.
डॉक्टरांनी जेव्हा त्याच्या लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याची सविस्तर माहिती घेतली, तेव्हा प्रेशर कुकरचं कारण समोर आलं. एक्सपर्ट्सचं मत आहे की, जुन्या प्रेशर कुकरच्या आत तळाला निकेलचं कोटिंग लावलं जातं, जे अन्न चिकटू नये म्हणून असतं. ते काळानुसार घासू लागतं. घर्षणामुळे शिसे किंवा इतर हेव्ही मेटल्स खाण्यात मिक्स होतात, खासकरून तेव्हा जेव्हा अन्न हाय टेम्प्रेचरवर शिजवलं जातं.
२० वर्ष जुन्या कुकरनं दिला आजार
या केसबाबत सांगताना डॉक्टर विशाल गाबले यांनी सांगितलं की, रूग्णाची पत्नी २० वर्षांपासून एकाच अॅल्यूमिनिअमचा प्रेशर कुकर वापरत होती. यादरम्यान आंबट किंवा अॅसिडिक फूड जुन्या कुकरच्या मेटलसोबत रिअॅक्शन करत अन्न विषारी बनवत होते.
काय आहे लीड पॉयजनिंग?
लीड पॉयजनिंग तेव्हा होतं जेव्हा शरीरात शिस्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. हे विष श्वासाद्वारे, त्वचेच्या संपर्कात आल्यानं किंवा खाण्या-पिण्याच्या माध्यमातून शरीरात पोहोचतं. नंतर हळूहळू मेंदू, नसा, किडनी, रिप्रोडक्टिव सिस्टीम आणि डायजेशनला प्रभावित करतं. अनेकदा सुरूवातीची लक्षणं फार हलकी असतात. ज्यांकडे कमजोरी किंवा थकवा समजून दुर्लक्ष केलं जातं.
लीड पॉयजनिंगची लक्षणं
सतत थकवा आणि कमजोरी
पोटात वेदना
डोकेदुखी
उलटी किंवा मळमळ
पाय आणि हातांमध्ये झिणझिण्या
फोकस करण्यास अडचण
स्मरणशक्ती कमजोर होणे
व्यवहारात बदल
लैंगिक समस्या
लहान मुलांना अभ्यासात अडचण
चिडचिडपणा
यावर उपाय आहे का?
जर वेळीच या आजाराचा पत्ती लागला तर उपचार शक्य आहे. या रूग्णांचा उपचार Chelation Therapy च्या माध्यमातून केला जातो. ज्यात औषधं दिली जातात. जी रक्तातील शिसे शरीरातून बाहेर काढतात. फार जास्त टॉक्सिसिटीच्या स्थितीत डॉक्टर्स बॉवेल इरिगेशनसारखा उपायही करतात. ज्यात पोट आणि आतड्यांना पूर्णपणे साफ केलं जातं.
कसा कराल बचाव?
जुन्या अॅल्यूमिनिअम किंवा नॉन फूड ग्रेड भांड्यांचा वापर लगेच बंद करा.
आंबट गोष्टी जुन्या भांड्यांमध्ये शिजवणं टाळा.
भांड्यांचा थर निघत असेल तर बदलून टाका.
पेंट, प्लास्टिक आणि लोखंडाच्या जुन्या भांड्यांमध्ये शिसे असू शकतं. ही भांडी लहान मुलांपासून दूर ठेवा.