lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > गॅस लवकर संपतो? गॅस बर्नर स्वच्छ करण्याची खास ट्रिक - सिलेंडर लवकर संपण्याची भीतीच नाही

गॅस लवकर संपतो? गॅस बर्नर स्वच्छ करण्याची खास ट्रिक - सिलेंडर लवकर संपण्याची भीतीच नाही

Kitchen Tips To Clean Gas Burner : गॅस बर्नर साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स माहित करून घेतल्या तर तुमचं काम अधिकच सोपं  होईल आणि गॅसची फ्लेम चांगली चालेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 07:13 PM2024-05-14T19:13:07+5:302024-05-14T19:27:23+5:30

Kitchen Tips To Clean Gas Burner : गॅस बर्नर साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स माहित करून घेतल्या तर तुमचं काम अधिकच सोपं  होईल आणि गॅसची फ्लेम चांगली चालेल.

Kitchen Tips To Clean Gas Burner : Gas Burner Cleaning Tips Gas Stove Cleaning Tips | गॅस लवकर संपतो? गॅस बर्नर स्वच्छ करण्याची खास ट्रिक - सिलेंडर लवकर संपण्याची भीतीच नाही

गॅस लवकर संपतो? गॅस बर्नर स्वच्छ करण्याची खास ट्रिक - सिलेंडर लवकर संपण्याची भीतीच नाही

गॅस हा सर्वांच्याच घरात नियमित वापरली जाणारी गोष्ट आहे. अनेकांची तक्रार असते की गॅस लवकर संपतो किंवा गॅस ठरावविक वेळेपर्यंत पुरत नाही. (Cleaning Tips)  गॅस लवकर संपण्याची अनेक कारणं असू शकतात जसं की गॅस बर्नर स्लो चालणं, किंवा गॅस बर्नरमध्ये कचरा अडकणं. गॅस बर्नर साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स माहित करून घेतल्या तर तुमचं काम अधिकच सोपं  होईल आणि गॅसची फ्लेम चांगली चालेल. (Gas Stove Cleaning Tips)

अनेक महिला स्वयंपाक करताना किंवा दूध उकळताना गॅसवर पाडतात. ज्यामुळे गॅस कमी चालू लागतो. दीर्घकाळ याची साफ-सफाई न केल्यास  गंज  सुद्धा लागतो. म्हणून गॅस स्टोव्ह जाम होऊ लागतो. हे टाळण्यासाठी नट बोल्ड उघडून स्टोव्ह  काढून घ्या आणि  स्वच्छ कापडाने धुवा. ( Gas Burner Cleaning Tips)

1) बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर

सगळ्यात आधी एका बर्नरमध्ये गॅस स्टोव्हमधून काढून घ्या. एका मोठ्या भांड्यात गरम पाणी, अर्धा कप बेकींग सोडा आणि एक चतृतांश कप व्हिनेगर मिसळा,  हे मिश्रण बर्नरवर  ३० मिनिटांसाठी लावून ठेवा,  बर्नर काढून त्यावर मऊ कापडाने रगडून स्वच्छ करा. स्टोव्हची जाळी साफ करायला विसरू नका.

2) लिंबाचा रस

लिंबाच्या रसात बुडवलेला एक स्पंज बर्नरवर रगडून घ्या. नंतर तेल आणि कार्बन सहज स्वच्छ होईल. 

3) डिटर्जेंट पावडर

गरम पाण्यात डिटर्जेंट पावडर मिसळा आणि बर्नर रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी या पाण्याने धुवून सुकवा. गॅस स्टोव्हच्या साफ-सफाईबरोबरच गॅस पाईप चेक करा कारण पाईप घाणेरडा झाल्यानंतर गॅस नियमित पुरत नाही यामुळे पाईप प्रत्येक आठवड्याला  चेक करत राहा आणि ३ महिन्यांच्या अंतराने पाईप बदला.

4) अमोनिया

अमोनिया  एक मजबूत क्लिनिंग एक एजंट आहे. ज्यामुळे हट्टी  डाग निघून जातात. एका छोट्या प्लास्टीकच्या बॅगमध्ये अमोनिया घाला आणि त्यात  गॅस बर्नरच्या वरच्या भागांवर घालून बॅग बंद करा. रात्रभर तसंच सोडून द्या. सकाळी गॅस बर्न काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे यावर जमा झालेली घाण आणि कार्बन सहज निघून जाण्यास मदत होईल.

Web Title: Kitchen Tips To Clean Gas Burner : Gas Burner Cleaning Tips Gas Stove Cleaning Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.