Join us

Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:02 IST

Kitchen Hack: जर तुमचा गॅस बर्नरही काळा पडला असेल आणि त्याची फ्लेम मंद झाली असेल, तर हा उपाय करून शेगडी नव्यासारखी चमकवू शकता. 

स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरला जाणारा भाग म्हणजे गॅस स्टोव्हचा बर्नर. रोजच्या वापराने, तेल, मसाले किंवा दूध उतू गेल्यामुळे बर्नरवर काळ्या आणि चिकट डागांचा थर जमा होतो. या घाणीमुळे बर्नरचे बारीक छिद्र बंद होतात, परिणामी गॅसची फ्लेम मंद होते आणि इंधनाची जास्त नासाडी होते.

जर तुमचा गॅस बर्नरही काळा पडला असेल आणि त्याची फ्लेम मंद झाली असेल, तर त्याला घासून स्वच्छ करण्यात वेळ घालवण्याऐवजी, तुम्ही घरातल्याच दोन वस्तूंचा वापर करून चमत्कारिकपणे काही मिनिटांत ती स्वच्छ करू शकता आणि नव्यासारखी चमकवू शकता. 

गॅस बर्नर साफ करण्यासाठी लागणारे साहित्य

ॲल्युमिनियम फॉईल, टूथपेस्ट, खराब टूथब्रश, बारीक तार

गॅस बर्नर साफ करण्याची सोपी पद्धत :

१. एका भांड्यात २ ग्लास पाणी घ्या आणि त्यात ॲल्युमिनियम फॉईलचा एक मोठा तुकडा टाका. हे पाणी चांगले गरम करून एका वाटीत ओतून घ्या. आता गॅस बर्नर १० मिनिटांसाठी या गरम फॉईलच्या पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे चिकटलेली घाण, तेलकट थर आपोआप सुटेल. 

२. दहा मिनिटांनंतर बर्नर बाहेर काढून त्यावर टूथपेस्टचा जाड थर लावा. ५ मिनिटे टूथपेस्ट तशीच राहू द्या, यामुळे टूथपेस्टमधील घटक तेलकट थर सोडण्यास मदत करेल. आता एका खराब टूथब्रशच्या मदतीने बर्नर हलक्या हाताने घासा.

३. ज्या ॲल्युमिनियम फॉईलने पाणी गरम केले होते, त्याच फॉईलला घेऊन बर्नरच्या काळ्या भागावर घासा. फॉईल घासण्याचे काम स्क्रेपर प्रमाणे करते आणि जिद्दी डाग निघण्यास मदत होते. घासल्यानंतर बर्नर स्वच्छ पाण्याने धुवा.

५. शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे, एका सींक किंवा बारीक तारेच्या मदतीने बर्नरचे छिद्र आतून आणि बाहेरून साफ करा, जेणेकरून साफसफाई करताना जमा झालेली सगळी घाण बाहेर पडेल.

४. त्यानंतर बर्नर स्वच्छ कपड्याने पुसून पूर्णपणे सुकवा. बर्नर पूर्णपणे कोरडा झाल्यानंतरच तो पुन्हा गॅस स्टोव्हवर लावावा. 

या सोप्या घरगुती हॅकमुळे तुमचा गॅस बर्नर अगदी नव्यासारखा चमकेल आणि फ्लेम पुन्हा तीव्र होईल, ज्यामुळे तुमचा स्वयंपाकाचा वेळ आणि गॅसची बचत होईल! 

English
हिंदी सारांश
Web Title : Clean Gas Burners Easily: Simple Kitchen Hack for Sparkling Results

Web Summary : Clean blackened gas burners quickly using aluminum foil and toothpaste. Soak in warm foil water, apply toothpaste, scrub, and clear burner holes. Restore flame intensity and save gas.
टॅग्स :किचन टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडी