काहीही खाण्या-पिण्यासाठी तोंड उघडणं महत्वाचं असतं. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. काही तासांसाठी जरी तोंड उघडलं नाही तर काय होईल याचा कदाचित कुणी विचारही करत नसेल. पण अशा विचार करा की, जर तोंड ९०० दिवसांपेक्षा जास्त उघडलंच नाही तर काय होईल? म्हणजे हा विचार जरा अघोरीच आहे. पण कोलकात्यामधील एका १० वर्षीय मुलीसोबत अशी घटना घडली आहे. तब्बल ९१२ दिवस तिचं तोंड बंद होतं.
अनेक डॉक्टरांनी तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही. शेवटी कोलकात्यातील एका सरकारी दंत रुग्णालयातील डॉक्टरांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. ९०० दिवसांहून अधिक काळ तोंड बंद करता न येणाऱ्या एका मुलीची समस्या आता दूर झाली आहे. यशस्वी उपचारानंतर ती आता आपले तोंड बंद करू शकते. ही माहिती रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.
९१२ दिवसांनंतर बंद झाले चिमुकलीचे तोंड
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, १० वर्षांची ही मुलगी अशा आजाराने ग्रस्त होती, ज्यामध्ये जबडा आणि चेहऱ्याच्या स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांना नुकसान झाले होते. त्यामुळे तिला साधारण ९१२ दिवसांपासून तोंड बंद करता येत नव्हतं. राज्यात तसेच राज्याबाहेरील अनेक रुग्णालयांत उपचार करूनही तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर तिला आर. अहमद डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं, जिथे उपचारानंतर ती अखेर तोंड बंद करू शकली.
दुर्मिळ आजार आणि चिमुकलीची झुंज
रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी ‘पीटीआय’ला सांगितलं की, ही मुलगी अॅक्यूट डिसेमिनेटेड एन्सेफेलोमायलायटिस या दुर्मिळ मज्जासंस्थेच्या विकाराने ग्रस्त होती. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मेंदू आणि पाठीच्या कण्यावर हल्ला करते. दीर्घकाळ तोंड बंद न होऊ शकल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामध्ये जबड्याचं संतुलन बिघडणे आणि दात असामान्य पद्धतीने वरच्या दिशेने वाढणे यांचा समावेश होता.
चिमुकलीवर यशस्वी उपचार
रुग्णालयात उपचारांसाठी विशेष वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली. सविस्तर तपासणीनंतर डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की तोंड बंद करणे हे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. उपचारात सहभागी असलेल्या एका डॉक्टरांनी सांगितले की, “या प्रकरणात जबडा बंद करण्यासाठी आणि पुढील समस्या टाळण्यासाठी मागील दात काढणे हाच एकमेव पर्याय होता.” या प्रक्रियेनंतर आता मुलगी यशस्वीपणे आपले तोंड बंद करू शकत आहे.
Web Summary : A 10-year-old girl from Kolkata, unable to close her mouth for 912 days due to a rare neurological disorder, has found relief. Doctors successfully treated her at a dental hospital, enabling her to close her mouth after extensive treatment and a specialized medical committee intervention.
Web Summary : कोलकाता की एक 10 वर्षीय लड़की, जो एक दुर्लभ तंत्रिका संबंधी विकार के कारण 912 दिनों से अपना मुंह बंद करने में असमर्थ थी, को राहत मिली है। डॉक्टरों ने एक दंत अस्पताल में सफलतापूर्वक उसका इलाज किया, जिससे वह व्यापक उपचार और एक विशेष चिकित्सा समिति के हस्तक्षेप के बाद अपना मुंह बंद करने में सक्षम हो गई।