Lokmat Sakhi >Social Viral > International Lefthanders Day 2025 : रतन टाटा-अमिताभ बच्चन-कपील शर्मा ‘लेफ्टी’ माणसं जास्त यशस्वी असतात, कारण..

International Lefthanders Day 2025 : रतन टाटा-अमिताभ बच्चन-कपील शर्मा ‘लेफ्टी’ माणसं जास्त यशस्वी असतात, कारण..

International Lefthanders Day 2025: Ratan Tata-Amitabh Bachchan-Kapil Sharma 'Lefty' people are more successful in life : डावऱ्या लोकांबद्दल अनेकांना अनेक प्रश्न असतात. डावरं असणं खरंच अशुभ असतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 14:16 IST2025-08-13T14:15:32+5:302025-08-13T14:16:49+5:30

International Lefthanders Day 2025: Ratan Tata-Amitabh Bachchan-Kapil Sharma 'Lefty' people are more successful in life : डावऱ्या लोकांबद्दल अनेकांना अनेक प्रश्न असतात. डावरं असणं खरंच अशुभ असतं का?

International Lefthanders Day 2025: Ratan Tata-Amitabh Bachchan-Kapil Sharma 'Lefty' people are more successful in life | International Lefthanders Day 2025 : रतन टाटा-अमिताभ बच्चन-कपील शर्मा ‘लेफ्टी’ माणसं जास्त यशस्वी असतात, कारण..

International Lefthanders Day 2025 : रतन टाटा-अमिताभ बच्चन-कपील शर्मा ‘लेफ्टी’ माणसं जास्त यशस्वी असतात, कारण..

शरीर प्रक्रियांची रचना ही प्रत्येकाची सारखीच असते. शरीराच्या अंतर्गत कृती कशा होतात याची एक रुपरेखा असते जी आपण शाळेत असतानाच शिकलो आहोत. अर्थात व्यक्तीनुसार काही बदल होतात. (International Lefthanders Day 2025: Ratan Tata-Amitabh Bachchan-Kapil Sharma 'Lefty' people are more successful in life)सगळ्यांमध्ये काही फरक असतोच. कोणतेही काम करायचे म्हटले की साहाजिकच उजवा हात पुढे केला जातो. मात्र असेही काही असतात ज्यांचा डावा हात प्रथम आपसूकच वापरला जातो. उजवा हात - डावा हात दोन्ही हातांना मिळणारी चेतना आणि त्यांची कार्यक्षमता समान नसते. वेगवेगळी असते. एकदा डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करा उजव्या हातासारखा डावा हात चालत नाही. अगदी काही मोजकी लोकं असतात ज्यांना दोन्ही हातांनी समान कृती करता येतात. 

आपल्याकडे अनेक चुकीच्या मान्यता आहेत त्यापैकी एक म्हणजे मुल डावरे नको. लहानपणी जेव्हा मुल डावरं आहे हे लक्षात येतं तेव्हापासूनच पालक त्याला उजव्या हाताचा वापर करण्यासाठी जबरदस्ती करायला लागतात. त्यामुळे तो मुळात डावरा असणारा व्यक्ती उजवा हात वापरतो खरा मात्र त्याच्या कौशल्य क्षमतेवर परिणाम होतो. डावा हात वापरणे आजही अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. मुळात त्यामागे काहीही शुभ अशुभ नसून त्याचा थेट संबंध न्यूरोलॉजीशी असतो.
 
डावऱ्या लोकांच्या मेंदूची रचना उजव्या लोकांपेक्षा थोडी वेगळी असते. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. मेंदूत भाषेची साठवणही वेगळ्या भागात होते. तसेच विचारांचे, कार्य वाटपाचे गणित जरा वेगळेच असते. एवढेच नाही तर काही वेळा प्रतिक्रियेचा वेगही वेगळा असतो.

अर्थात अनेक सामान्य मात्र रोजच्या जीवनातल्या अडचणींना सामोरे जावे लागते. रोजच्या वापराच्या वस्तूंची रचना ही उजव्या हाताला अनुसरुन असते. त्यामुळे डावऱ्या लोकांना साधी कात्री वापरतानाही त्रास होतो. सोलाणे वापरुन एक काकडी सोलतानाही कठीण जाते. दरवाजा उघडताना पटकन डावा हात पुढे येतो आणि दरवाजा पायाच्या बोटाला चांगलाच दणका देतो. या गमती-जमती रोजच डावऱ्या लोकांसोबत घडत असतात. 

बिल गेट्स, रतन टाटा, अमिताभ बच्चन आदी अनेक प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तिमत्व आहेत जे डावरे आहेत. त्यामुळे डावा हात वापरणे म्हणजे अपयशाचे लक्षण किंवा अशुभ मानून मुलांना मारूनमुटकून उजवा हात वापरायला लावायची काहीच गरज नाही. त्यांच्या मेंदू रचनेप्रमाणे त्यांना कार्य करु द्या.

Web Title: International Lefthanders Day 2025: Ratan Tata-Amitabh Bachchan-Kapil Sharma 'Lefty' people are more successful in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.