Lokmat Sakhi >Social Viral > शाब्बास पोरी! लेकीनं आईवडिलांना थेट अमेरिकेत नेऊन दाखवलं स्वत:चं ऑफिस, पाणावले त्यांचेही डोळे

शाब्बास पोरी! लेकीनं आईवडिलांना थेट अमेरिकेत नेऊन दाखवलं स्वत:चं ऑफिस, पाणावले त्यांचेही डोळे

Viral Emotional Video: लेकीचं अमेरिकेतलं ऑफिस पाहून भारावून गेलेले भारतीय आई- वडील सध्या साेशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.(Indian woman takes parents to her Walmart office in US )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:54 IST2025-06-11T16:57:33+5:302025-06-13T18:54:50+5:30

Viral Emotional Video: लेकीचं अमेरिकेतलं ऑफिस पाहून भारावून गेलेले भारतीय आई- वडील सध्या साेशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.(Indian woman takes parents to her Walmart office in US )

Indian woman takes parents to her Walmart office in US viral video of indian parents Melts Hearts Online | शाब्बास पोरी! लेकीनं आईवडिलांना थेट अमेरिकेत नेऊन दाखवलं स्वत:चं ऑफिस, पाणावले त्यांचेही डोळे

शाब्बास पोरी! लेकीनं आईवडिलांना थेट अमेरिकेत नेऊन दाखवलं स्वत:चं ऑफिस, पाणावले त्यांचेही डोळे

Highlights त्यांनी आयुष्यात एवढं मोठं ऑफिस कधीच पाहिलेलं नाही. त्यामुळे हे सगळं पाहून ते खूप आश्चर्यचकीत झाले, भारावून गेले असंही तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

कोणतेही पालक असो.. मग ते जगाच्या पाठीवर कुठेही राहणारे असो, त्यांची जात- पात- धर्म कोणताही असो.. ते गरीब असो किंवा श्रीमंत असो.. प्रत्येक पालकाचं आपल्या मुलांबाबत एकच स्वप्न असतं की आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी. आपण जे काही मिळवलं आहे त्याच्या कित्येकपटीने जास्त त्यांना मिळावं. त्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त सुखी, समाधानी, आनंदी आणि संपन्न असावं.. हीच आस मनात ठेवून पालक मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी धडपड करत असतात. जेव्हा पालकांची ही धडपड यशस्वी होते आणि मुलं उंच भरारी घेतात, तेव्हा जन्मदात्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद केवळ अवर्णनीय.. असाच काहीसा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे..(Indian woman takes parents to her Walmart office in US)


 

अमेरिकेतल्या वॉलमार्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या देवश्री या भारतीय तरुणीने तिचा एक व्हिडिओ devshree.17 या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. यामध्ये असं दिसत आहे की ती तिच्या पालकांना पहिल्यांदाच तिच्या अमेरिकेतल्या ऑफिसमध्ये घेऊन आली.

लग्नसराईमध्ये एकदम युनिक मेहेंदी काढायची? 'या' पद्धतीने ChatGPT ला विचारा, डिझाईन्स मिळतील खास

लेकीच्या ऑफिसच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जातानाच तिचे आईवडील भारावून गेलेले दिसले. तिथे तिने त्यांना प्रत्येक ठिकाणी फिरवून आणलं आणि ऑफिसचा अगदी कानाकोपरा दाखवला. आापली लेक किती उत्तम ठिकाणी काम करते आहे, हा आनंद तिच्या पालकांच्या चेहऱ्यावरून प्रत्येक ठिकाणी दिसून येत होता.

मुलांना डब्यात काय द्यावं हा रोजचाच प्रश्न? ६ चटपटीत, पौष्टिक पदार्थ- मुलं एन्जॉय करत खातील

त्या ऑफिसमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा, काम करण्याची पद्धत, मोठी मोठी दालनं आणि तिथे आत्मविश्वासाने काम करणारी आपली लेक हे सगळं पाहून त्या मातापित्याला धन्य धन्य झालं असणार.. त्यांनी आयुष्यात एवढं मोठं ऑफिस कधीच पाहिलेलं नाही. त्यामुळे हे सगळं पाहून ते खूप आश्चर्यचकीत झाले, भारावून गेले असंही तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

 

Web Title: Indian woman takes parents to her Walmart office in US viral video of indian parents Melts Hearts Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.