lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > खुशखबर! भारतीय रेल्वेचं महिलांना खास गिफ्ट; बाळासह प्रवास करणाऱ्या आईसाठी स्पेशल सीट

खुशखबर! भारतीय रेल्वेचं महिलांना खास गिफ्ट; बाळासह प्रवास करणाऱ्या आईसाठी स्पेशल सीट

Indian Railway Introduces Baby Berth : न्यूज एजन्सी ANI ने  या सीटची छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात रेल्वेने खालच्या सीटवर एक विशेष सीट बसवण्याची व्यवस्था केली आहे.जी महिलांसोबत प्रवास करणाऱ्या बाळांसाठी असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 04:30 PM2022-05-10T16:30:48+5:302022-05-10T17:11:28+5:30

Indian Railway Introduces Baby Berth : न्यूज एजन्सी ANI ने  या सीटची छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात रेल्वेने खालच्या सीटवर एक विशेष सीट बसवण्याची व्यवस्था केली आहे.जी महिलांसोबत प्रवास करणाऱ्या बाळांसाठी असेल.

Indian Railway Introduces Baby Berth : Railway introduces baby berth on a trial basis in trains for facilitating mothers to comfortably sleep along with infants | खुशखबर! भारतीय रेल्वेचं महिलांना खास गिफ्ट; बाळासह प्रवास करणाऱ्या आईसाठी स्पेशल सीट

खुशखबर! भारतीय रेल्वेचं महिलांना खास गिफ्ट; बाळासह प्रवास करणाऱ्या आईसाठी स्पेशल सीट

नवजात बालकांसह ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. मातांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने ट्रेनमध्ये बेबी बर्थ सीट सुरू केली आहे. मात्र, सध्या ते चाचणी तत्त्वावर सुरू आहे. न्यूज एजन्सी ANI च्या मते, दिल्ली विभाग उत्तर रेल्वेने निवडक गाड्यांमध्ये चाचणी आधारावर 'बेबी बर्थ' सुरू केली आहे जेणेकरून मातांना त्यांच्या बाळांसह आरामात झोपून प्रवास करता येईल. ( Railway introduces baby berth on a trial basis in trains for facilitating mothers to comfortably sleep along with infants)

न्यूज एजन्सी ANI ने  या सीटची छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात रेल्वेने खालच्या सीटवर एक विशेष सीट बसवण्याची व्यवस्था केली आहे, जी महिलांसोबत प्रवास करणाऱ्या बाळांसाठी असेल. याची चाचणी यशस्वी झाली, तर लवकरच अनेक गाड्यांमध्येही पाहायला मिळेल.

सर्वप्रथम, उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाने बेबी बर्थ नावाचा हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामध्ये छोटं बेबी बर्थ  सीट जोडले जाईल, जे लहान मुलांसाठी असेल.  ज्या महिला प्रवासी आपल्या मुलांसोबत बाहेर जातात त्यांच्यासाठी हे सीट फायदेशीर ठरेल. लहान मूल झोपेत असताना खाली पडू नये म्हणून सुरक्षिततेचा उपाय म्हणून रेल्वे बर्थच्या बाजूला स्टॉपर देखील देण्यात येणार आहे.

 खर्च फक्त १० रुपये, घरातील पालींना कायमचं पळवा; 5 सोपे उपाय, भिंतीवरच्या पाली गायब

DRM, लखनौ यांनी ट्विट करून मातृदिना निमित्तानं याबाबत माहिती दिली. एक पुढाकार म्हणून, लखनौ मेलच्या कोच क्रमांक 194129/B4 मध्ये बर्थ क्रमांक 12 आणि 60 मध्ये ही सीट सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून आई आपल्या मुलासोबत प्रवास करू शकेल. सीट फोल्ड करण्यायोग्य आहे आणि स्टॉपर सुरक्षित आहे.

Web Title: Indian Railway Introduces Baby Berth : Railway introduces baby berth on a trial basis in trains for facilitating mothers to comfortably sleep along with infants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.