lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > फक्त ५ मिनिटांत न घासता फ्रिज होईल नव्यासारखं चकाचक, ४ पदार्थांची भन्नाट जादू- बघा सोपा उपाय

फक्त ५ मिनिटांत न घासता फ्रिज होईल नव्यासारखं चकाचक, ४ पदार्थांची भन्नाट जादू- बघा सोपा उपाय

Deep Cleaning Of Refrigerator Or Fridge In Just 5 Minutes: घाण झालेलं, डाग पडलेलं फ्रिज आतून स्वच्छ करणं अवघड वाटत असेल तर हा एकदम सोपा उपाय करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 03:46 PM2024-01-19T15:46:30+5:302024-01-19T15:47:44+5:30

Deep Cleaning Of Refrigerator Or Fridge In Just 5 Minutes: घाण झालेलं, डाग पडलेलं फ्रिज आतून स्वच्छ करणं अवघड वाटत असेल तर हा एकदम सोपा उपाय करून पाहा...

In just 5 minutes, your fridge will be shiny like new, no need to scrub - Deep cleaning of refrigerator or fridge in just 5 minutes, Easy and simple trick to clean the stains in refrigerator in marathi | फक्त ५ मिनिटांत न घासता फ्रिज होईल नव्यासारखं चकाचक, ४ पदार्थांची भन्नाट जादू- बघा सोपा उपाय

फक्त ५ मिनिटांत न घासता फ्रिज होईल नव्यासारखं चकाचक, ४ पदार्थांची भन्नाट जादू- बघा सोपा उपाय

Highlightsहे अवघड काम सोपं कसं करायचं आणि तुमच्या फ्रिजमधले जुने, पक्के झालेले डाग कसे झटपट काढून टाकायचे ते पाहूया.

फ्रिज ही आपल्या रोजच्या वापरातली वस्तू. त्यात आपण बरेच अन्नपदार्थ नेहमीच ठेवत असतो किंवा आतले बाहेर काढत असतो. काही जणांच्या फ्रिजमध्ये तर अक्षरश: वेगवेगळे अन्नपदार्थ कोंबलेले असतात. अशावेळी पदार्थ ठेवताना किंवा काढताना सतत काहीतरी सांडतं आणि फ्रिज घाण होत जातं. खरंतर आठवड्यातून एकदा फ्रिज स्वच्छ करणं गरजेचं असतं. पण आपल्याकडून ते काम नियमितपणे होत नाही. त्यामुळे मग जेव्हा फ्रिज खूपच जास्त अस्वच्छ होतं, तेव्हा आपण फ्रिजची स्वच्छता मोहिम हाती घेतो. (Easy and simple trick to clean the stains in refrigerator in marathi)

 

अशाप्रकारे खूप दिवस न स्वच्छ केलेलं फ्रिज स्वच्छ- चकाचक करायचं म्हटलं तर खरोखरच थोडा जास्त वेळ द्यावा लागतो आणि थोडी अधिक मेहनत घ्यावी लागते.

पिवळट दात पांढरेशुभ्र होऊन मोत्यासारखे लख्ख चमकतील- बघा केळीच्या सालींचा खास उपयोग

पण आता हे अवघड काम सोपं कसं करायचं आणि तुमच्या फ्रिजमधले जुने, पक्के झालेले डाग कसे झटपट काढून टाकायचे ते पाहूया. या उपायानुसार अवघ्या ५ ते ७ मिनिटांत सगळं फ्रिज अगदी नव्यासारखं चकाचक होऊन जाईल. शिवाय त्यासाठी तुम्हाला फ्रिज घासत बसण्याचीही गरज नाही. हा उपाय इन्स्टाग्रामच्या manpreetk0urr या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

फ्रिज स्वच्छ करण्याचा उपाय

फ्रिजचा आतला भाग स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कॉफी पावडर, लिंबू, व्हिनेगर आणि लिक्विड डिशवॉश लागणार आहे.

वाढत्या काेलेस्ट्रॉलची सतत काळजी वाटते? 'हा' १ मसाला दररोज खा, कोलेस्ट्रॉल नेहमीच राहील कंट्रोलमध्ये

सगळ्यात आधी साधारण अर्धा ते पाऊण लीटर पाणी गरम करून घ्या. गरम पाण्यात १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा व्हिनेगर, १ चमचा लिक्विड डिशवॉश आणि एका लिंबाचा रस घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत मुलांनी आई- वडिलांजवळच झाेपणं याेग्य असतं? तज्ज्ञ सांगतात..

आता हे मिश्रण फ्रिजमध्ये शिंपडा. सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल याची काळजी घ्या. पुढचे २ ते ३ मिनिटे ते तसेच राहू द्या. त्यानंतर एखादा स्वच्छ सुती कपडा घेऊन फ्रिज पुसून घ्या. पुसून घेताच फ्रिज अगदी स्वच्छ होऊन जाईल. घासत बसण्याचीही गरज राहणार नाही. 

 

Web Title: In just 5 minutes, your fridge will be shiny like new, no need to scrub - Deep cleaning of refrigerator or fridge in just 5 minutes, Easy and simple trick to clean the stains in refrigerator in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.