आयएएस अधिकारी संस्कृती जैन यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने निरोप दिला. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सोनेरी पालखीत संस्कृती यांना त्यांच्या दोन मुलींसह बसवण्यात आलं. सर्वांसाठीच हा अत्यंत भावुक क्षण होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. “पालकी में होके सवार चली” हे गाणं वाजताच संस्कृती यांचे देखील डोळे पाणावले. सहकाऱ्यांकडून इतकं प्रेम मिळाल्याने त्या भावुक झाल्या.
भोपाळमध्ये नवीन पोस्टिंगसाठी रवाना होण्यापूर्वी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात आयएएस अधिकारी संस्कृती जैन यांचा सन्मान करण्यात आला. निरोप समारंभात, जैन यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी सोन्याच्या पालखीत बसवून त्यांच्या दोन लहान मुलींसह मोठा उत्सव साजरा केला. व्हायरल पोस्टनुसार, सिवनी जिल्हाधिकारी म्हणून १५ महिन्यांच्या कार्यकाळात जैन यांना अनेक प्रभावी उपक्रमांसाठी ओळखले गेले.
An MP IAS officer Sanskriti Jain, Collector Seoni,was given a unique farewell by her staff. Unheard of before.
— Abhilash Khandekar (@Abhikhandekar1) October 5, 2025
Many officers hv been popular during their postings owing to people-oriented works & honesty, yet this was something new.
Let more officers be like her.@IASassociationpic.twitter.com/wsebdt9ELw
संस्कृती यांनी लाडली बहन योजना अटल पेन्शन योजनेत विलीन केली आणि सामुदायिक सहभाग कार्यक्रमांद्वारे डेस्क आणि बेंच प्रदान करून प्राथमिक शाळांना पाठिंबा दिला. सार्वजनिक कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी त्यांच्या कार्यकाळाचं सर्वत्र कौतुक झालं. १४ फेब्रुवारी १९८९ रोजी श्रीनगर येथे जन्मलेल्या जैन यांचे वडील पायलट होते आणि आई वैद्यकीय विभागात काम करत होती. वारंवार बदल्यांमुळे त्यांनी भारतातील सहा वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेतलं.
बिट्स पिलानी (गोवा कॅम्पस) मधून पदवी घेतल्यानंतर संस्कृती यांनी सुरुवातीला पीएचडी करण्याचा विचार केला. एका मित्राच्या सूचनेनुसार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. दुसऱ्या प्रयत्नात आयआरएसमध्ये स्थान मिळवलं आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात आयएएसमध्ये सामील झाल्या. २०१४ मध्ये ऑल इंडिया ११ वा रँक मिळवला.
सिवनी येथील संस्कृती जैन यांचा कार्यकाळ प्रशासकीय कार्यक्षमता आणि जनसंपर्क यासाठी खूप प्रसिद्ध होता, ज्यामुळे त्यांना बराच आदर मिळाला. त्यांच्या कामाने लोकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून, स्थानिकांनी त्यांना अनोख्या स्वरुपात निरोप दिला. निरोपाचा हा व्हायरल व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.