Lokmat Sakhi >Social Viral > अंगाचा साबण संपत आला की चिपट्या फेकून देता? करा ४ उपयोग, उरलेल्या साबणापासून मिळतील भन्नाट गोष्टी

अंगाचा साबण संपत आला की चिपट्या फेकून देता? करा ४ उपयोग, उरलेल्या साबणापासून मिळतील भन्नाट गोष्टी

How To Use Leftover Soap : साबणाच्या तुकड्यांचा आपण घरातील कामांसाठी उपयोग करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 01:42 PM2023-08-30T13:42:41+5:302023-08-30T14:10:30+5:30

How To Use Leftover Soap : साबणाच्या तुकड्यांचा आपण घरातील कामांसाठी उपयोग करु शकतो.

How To Use Leftover Soap : When run out of body soap, do you throw away the pieces? 4 Uses Use bars of soap like this… | अंगाचा साबण संपत आला की चिपट्या फेकून देता? करा ४ उपयोग, उरलेल्या साबणापासून मिळतील भन्नाट गोष्टी

अंगाचा साबण संपत आला की चिपट्या फेकून देता? करा ४ उपयोग, उरलेल्या साबणापासून मिळतील भन्नाट गोष्टी

आपण सगळेच नियमितपणे आंघोळ करण्यासाठी अंगाचा साबण वापरतो. प्रत्येक जण वापरत असलेल्या साबणाची कंपनी, फ्लेवर, रंग, आकार वेगवेगळा असतो. पण हा साबण लावल्याशिवाय आपली आंघोळ पूर्ण होत नाही. साबण लावून भरपूर फेस केल्यावरच आपल्याला आंघोळ झाल्याचा फिल येतो. अनेकदा हात-पाय किंवा तोंड धुण्यासाठीही आपण हा साबण वापरतो. ही साबणाची वडी वापरुन वापरुन काही दिवसांनी संपते आणि मग आपण नवीन साबण काढतो. काही घरांत तर प्रत्येकाचे साबण वेगवेगळे असल्याने बाथरुममध्ये बरेच साबण असतात. हे साबण संपत आल्यावर त्याचा लहान तुकडा सोप केसमध्ये उरतो (How To Use Leftover Soap). 

या तुकड्यातील साबणाचा कंटेंट संपत आल्याने त्याचा फेसही होत नाही. अशावेळी हा तुकडा तसाच बरेच दिवस लोळत राहतो. मग काही दिवसांनी आपण हा तुकडा चक्क कचरापेटीत टाकून देतो. मात्र असे केल्याने हा साबण वाया जातो. पण या साबणाच्या तुकड्यांचा आपण घरातील बऱ्याच कामांसाठी उपयोग करुन घेऊ शकतो. त्यामुळे साफसफाईही होते आणि साबणाचा राहीलेला तुकडाही वाया जात नाही. मग या साबणाचा नेमका वापर कसा करायचा ते पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. बुटांचा वास घालवण्यासाठी उपयुक्त 

आपल्या पायाला अनेकदा घाम येतो आणि आपल्या पायातील बुटांमध्ये हा घाम मुरल्याने त्या बुटांना एकप्रकारचा कुबट वास यायला लागतो. मात्र हा वास घालवण्यासाठी आपण या साबणाच्या तुकड्यांचा चांगला वापर करु शकतो. यासाठी हे साबणाचे तुकडे एका पातळ अशा सुती कापडात बांधायचे आणि हे कापड बुटांमध्ये ठेवून द्यायचे. रात्रभर साबण बुटांमध्ये राहीला तर सकाळी बुटांना येणारा वास गेलेला असतो. 

२. रोपांसाठी बनवा किटकनाशक

आपल्या घरात एक छोटीशी का होईना टेरेस गार्डन किंवा होम गार्डन असतेच असते. यामध्ये ७-८ रोपं तर जरुर असतात. या रोपांकडे आपल्याला एरवी पुरेसे लक्ष द्यायला मिळतेच असे नाही. पण या उरलेल्या साबणाच्या तुकड्यांचा आपण रोपांसाठी किटकनाशक तयार करण्यासाठी नक्कीच वापर करु शकतो. यासाठी साबणाचे पाणी तयार करा त्यामध्ये व्हेजिटेबल ऑईल घालून हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवा. हे मिश्रण रोपांवर नियमितपणे मारा. त्यामुळे रोपांचे किड लागण्यापासून संरक्षण होईल. 

३. कपड्यांमधला ओलावा कमी करण्यासाठी 

पावसाळ्यात अनेकदा कपडे नीट वाळत नाहीत आणि कितीही वेळ दोरीवर ठेवले तरी थोडे गार आणि ओलसर राहतात. कपडे ओलसर राहिल्यास त्यात एकप्रकारचा ओलावा राहतो. हा ओलावा कमी करण्यासाठी साबणाच्या तुकड्यांचा चांगला उपयोग होतो. हे तुकडे सुती कापडात गुंडाळून कपड्यांच्या मध्ये ठेवायचे यामुळे कपड्यांचा ओलेपणा आणि कुबटपणा कमी होण्यास मदत होते.

४. हँडवॉश तयार करण्यासाठी 

या साबणाच्या तुकड्यांपासून आपण हॅंडवॉश तयार करु शकतो. खराब झालेले हात धुण्यासाठी या साबणाच्या तुकड्यांपासून हँडवॉश तयार करु शकतो. साधारणपणे आपण हँडवॉश विकत आणतो. मात्र साबणाचे १० ते १२ तुकडे जमा झाल्यावर ते चांगले क्रश करायचे आणि त्यात पाणी टाकून हँडवॉश तयार करायचा. सुगंध येण्यासाठी आपण यामध्ये आपल्या आवडीचे अरोमा ऑईल घालू शकतो. स्प्रे बॉटलमध्ये भरुन आपण हे मिश्रण साबण म्हणून वापर करतो.  
 

Web Title: How To Use Leftover Soap : When run out of body soap, do you throw away the pieces? 4 Uses Use bars of soap like this…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.