lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > किचन सिंक सतत तुंबते? बेकिंग सोड्याचा १ भन्नाट उपाय, प्लंबरला बोलावण्यची गरजही पडणार नाही..

किचन सिंक सतत तुंबते? बेकिंग सोड्याचा १ भन्नाट उपाय, प्लंबरला बोलावण्यची गरजही पडणार नाही..

How to Unclog Your Kitchen Sink, by using Baking soda : किचन सिंक तूंबू नये म्हणून करुन पाहा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 04:35 PM2023-10-20T16:35:31+5:302023-10-20T16:36:27+5:30

How to Unclog Your Kitchen Sink, by using Baking soda : किचन सिंक तूंबू नये म्हणून करुन पाहा खास उपाय

How to Unclog Your Kitchen Sink, by using Baking soda | किचन सिंक सतत तुंबते? बेकिंग सोड्याचा १ भन्नाट उपाय, प्लंबरला बोलावण्यची गरजही पडणार नाही..

किचन सिंक सतत तुंबते? बेकिंग सोड्याचा १ भन्नाट उपाय, प्लंबरला बोलावण्यची गरजही पडणार नाही..

किचन सिंकचा वापर दैनंदिन आयुष्यात दररोज होतो. गृहिणी ज्याप्रमाणे किचनचा वापर करतात, त्याचप्रमाणे किचन सिंकचा देखील वापर करतात. किचन सिंकमध्ये आपण खरकटी भांडी साठवून ठेवतो. वेळ मिळेल तसं आपण भांडी घासून काढतो. अनेकदा खरकटी भांड्यांमधील अन्न किचन सिंकच्या पाईपमध्ये जाऊन अडकते. ज्यामुळे किचन सिंक ब्लॉक होण्याची शक्यता वाढते.

किचन सिंक ब्लॉक झाल्यानंतर अनेक कामे रखडली जातात. मुख्य म्हणजे यामुळे रोगराई देखील पसरते. किचन सिंक ब्लॉक होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किचन सिंक कोणत्या कारणामुळे ब्लॉक होते? किचन सिंक ब्लॉक झाल्यावर करायचे काय? पाहा(How to Unclog Your Kitchen Sink, by using Baking soda ).

किचन सिंकमध्ये चुकूनही टाकू नका या गोष्टी

तेल

किचन सिंक अनेकदा तेलामुळे ब्लॉक होऊ शकते. कधीही किचन सिंकमध्ये गरम तेल टाकू नका. थंड झाल्यावर पाईपवर तेल गोठते. ज्यामुळे किचन सिंक ब्लॉक होऊ शकते.

कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का?

चहापत्ती

बहुतांश घरांमध्ये भांडी घासताना वापरलेली चहापत्ती तशीच टाकली जाते. ज्यामुळे सिंक ब्लॉक होऊ शकते. कारण चहाची पाने सिंकमध्ये पसरू लागतात, ज्यामुळे सिंकचा एस-बँड ब्लॉक होऊ शकतो. म्हणूनच चहाची पाने कधीही सिंकमध्ये टाकू नये. चहापत्ती नेहमी डस्टबिनमध्ये टाका. किंवा खत म्हणून याचा वापर गार्डनिंगसाठी करा. यासह खरकटे देखील टाकू नका.

२ चमचे चहा पावडरने लख्ख उजळतील सोन्याचांदीचे दागिने, पाहा हा सोपा उपाय

बेकिंग सोड्याचा उपाय

किचन सिंकच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर, ड्रेन फ्लश करा. यासाठी ३ ते ४ चमचे बेकिंग सोडा किचन सिंकच्या पाईपमध्ये शिंपडा, त्यानंतर हळुवारपणे त्यावर कोमट पाणी ओता. यामुळे काही मिनिटात ड्रेन फ्लश होईल, व किचन सिंक ब्लॉक होणार नाही.

Web Title: How to Unclog Your Kitchen Sink, by using Baking soda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.