lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का?

कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का?

Meet Hollywood actress seen fighting with Katrina Kaif in just a towel in Tiger 3, has starred in Marvel films : 'टायगर ३' चित्रपटाच्या ट्रेलरमधील कतरिनाच्या 'टॉवेल फाईट' या सीनची जोरदार चर्चा सुरु आहे..कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 01:35 PM2023-10-19T13:35:31+5:302023-10-19T13:36:21+5:30

Meet Hollywood actress seen fighting with Katrina Kaif in just a towel in Tiger 3, has starred in Marvel films : 'टायगर ३' चित्रपटाच्या ट्रेलरमधील कतरिनाच्या 'टॉवेल फाईट' या सीनची जोरदार चर्चा सुरु आहे..कारण..

Meet Hollywood actress seen fighting with Katrina Kaif in just a towel in Tiger 3, has starred in Marvel films | कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का?

कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का?

भाईजान सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित 'टायगर ३' (Tiger 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत खुद्द सलमान खान, बोल्ड अँड ब्यूटीफुल कतरिना कैफ (Katrina Kaif) यासह अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हटके भूमिकेत दिसणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांचे काही अॅक्शन सीन्स दिसले. मात्र, कतरिनाचा 'टॉवेल फाईट' भाव खाऊन गेला. या सीनमध्ये कतरिना एका अभिनेत्रीसोबत 'टॉवेल फाईट' करताना दिसत आहे. मात्र, ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? या सीनची सोशल मीडियात एवढी चर्चा का होत आहे?(Meet Hollywood actress seen fighting with Katrina Kaif in just a towel in Tiger 3, has starred in Marvel films).

बॉलीवूडमध्ये टॉवेल सीन्स खूप हिट आहे. आपल्याला आठवत असेल 'जिने के है चार दिन' या गाण्यामध्ये सलमानने टॉवेल स्टेप करून वेगळीच आयकॉनिक स्टेप आपल्या नावे केली. पण त्यानंतर कतरिनाचा बोल्ड टॉवेल फाईट सध्या लक्षवेधी ठरत आहे. यात एकाच टॉवेलमध्ये दोन सुंदर तरुणी फाईट करताना दिसून येत आहेत. पण कतरिनाला टफ फाईट देणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी आलिया भट्ट नेसून गेली जुनी साडी, लग्नात नेसलेलीच साडी तिने परत नेसली कारण..

टॉवेल फाईटमध्ये कतरिनासोबत पंगा घेणारी ती कोण?

कतरिना ज्या अभिनेत्रीसोबत टॉवेल फाईट करत आहे, ती अभिनेत्री 'ब्लॅक विडो' फेम मिशेल ली आहे. जी अॅक्शन लेडीच्या नावानेही प्रसिद्ध आहे. मिशेल ली ही एक सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री असून, मार्शल आर्टिस्ट आणि स्टंट वुमन देखील आहे.

तिने आपल्या कारकिर्दीत 'बुलेट ट्रेन', 'वेनम', 'सुसाइड स्क्वाड' अशा अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अॅक्शनची जादू दाखवली आहे. आता ती 'टायगर ३' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. मात्र, यात तिचा यात एकच सीन असून, तिच्या या एकाच सीनने धुरळा उडवून दिला आहे.

एका मुलाची आई आहे मिशेल

मिशेलच्या फिटनेसकडे पाहून कोणालाही असे वाटणार नाही की ती एका मुलाची आई आहे. हो, मिशेल एका मुलाची आई असून, ती स्वतःच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते.

ड्रीमगर्ल कधी म्हातारी होत नाही! सुपरस्टार असूनही केली प्रेमासाठी ' मोठी ' तडजोड, हेमा मालिनी म्हणते..

बॉलिवूडमधील डेब्यूबद्दल मिशेल सांगते..

एका मुलाखतीत मिशेल लीने 'टायगर ३' बद्दल सांगितले की, 'टायगर ३ या चित्रपटात माझी छोटीशी भूमिका आहे. जी फक्त फाईट सीन्सपुरती मर्यादित आहे. मला या चित्रपटात काम करून खूप छान वाटलं.'

Web Title: Meet Hollywood actress seen fighting with Katrina Kaif in just a towel in Tiger 3, has starred in Marvel films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.