lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सरच्या भांड्यांचे ब्लेड बोथट झाले? फक्त काही सेकंदाचा सोपा उपाय- पात्याला येईल नव्यासारखी धार

मिक्सरच्या भांड्यांचे ब्लेड बोथट झाले? फक्त काही सेकंदाचा सोपा उपाय- पात्याला येईल नव्यासारखी धार

How To Sharpen Mixer blade At Home: मिक्सरच्या भांड्याची ब्लेड बोथट झाली असल्यास हा एक सोपा उपाय करून पाहा...( 2 remedies for sharpening mixer blade)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 01:21 PM2024-03-29T13:21:59+5:302024-03-29T14:15:34+5:30

How To Sharpen Mixer blade At Home: मिक्सरच्या भांड्याची ब्लेड बोथट झाली असल्यास हा एक सोपा उपाय करून पाहा...( 2 remedies for sharpening mixer blade)

How to sharpen mixer blade, 2 remedies for sharpening mixer blade, Sharpen your mixer blades with 2 easy hacks | मिक्सरच्या भांड्यांचे ब्लेड बोथट झाले? फक्त काही सेकंदाचा सोपा उपाय- पात्याला येईल नव्यासारखी धार

मिक्सरच्या भांड्यांचे ब्लेड बोथट झाले? फक्त काही सेकंदाचा सोपा उपाय- पात्याला येईल नव्यासारखी धार

Highlights मिक्सरचं भांडं अगदी नव्यासारखं धारदार करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (

बऱ्याचदा असं होतं की खूप वापर झाल्याने मिक्सरच्या भांड्याची ब्लेड अगदी बोथट होऊन जाते. भांड्याची ब्लेड बदलून आणणं हे बरंच वेळखाऊ काम आहे. शिवाय त्यासाठी पैसेही जास्तीचे मोजावे लागतात ( 2 remedies for sharpening mixer blade). म्हणूनच वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत करून मिक्सरचं भांडं अगदी नव्यासारखं धारदार करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (Sharpen your mixer blades with 2 easy hacks). अगदी काही सेकंदाचे हे दोन उपाय आहेत.(How to sharpen mixer blade)

मिक्सरचं भांड्याची ब्लेड धारदार करण्यासाठी उपाय

 

मिक्सरच्या भांड्याची ब्लेड धारदार करण्यासाठी नेमके काय उपाय करावेत, याची माहिती alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये २ उपाय सांगण्यात आले असून ते नेमके कसे करायचे ते पाहूया...

उन्हाळ्यासाठी हलका- फुलका कॉटन कुर्ता घ्यायचा? ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत करा क्लासी खरेदी

१. ॲल्यूमिनियम फॉईल

बऱ्याचदा आपण हाॅटेलमधून काही पदार्थ मागवले तर ते ॲल्युमिनियम फाॅईलमध्ये पॅक करून येतात. ते फॉईल आपण टाकाऊ म्हणून कचऱ्यात टाकून देतो. पण त्याच्याच मदतीने आपण मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडला चांगली धार लावू शकतो. यासाठी ॲल्यूमिनियम फॉईलचे तुकडे करा. ते मिक्सरच्या भांड्यात टाकून काही सेकंदासाठी फिरवून घ्या. असा प्रयोग २- ३ वेळा करा. प्रत्येकवेळी नवीन फॉईलचे तुकडे करून टाका. मिक्सरच्या भांड्याची ब्लेड धारदार होईल. 

 

२. मीठ

मीठाचा वापर करूनही मिक्सरच्या ब्लेडला चांगली धार लावता येते.

भरपूर खा आणि वजन उतरवा! तुम्हाला माहिती आहे का वेटलॉससाठी 'Volume Eating' चा नवा ट्रेण्ड?

यासाठी मिक्सरच्या भांड्यात मीठ टाका आणि काही सेकंदांसाठी ते फिरवून घ्या. मिक्सरच्या भांड्याची ब्लेड धारदार होण्यास मदत होईल. 

 

Web Title: How to sharpen mixer blade, 2 remedies for sharpening mixer blade, Sharpen your mixer blades with 2 easy hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.