स्वयंपाक करणं हे रोजचं काम असतं. स्वंयपाकासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे गॅस आणि सिलेंडर. दिवसेंदिवस गॅस सिलेंडरचे (Gas Cylinder) भाव गगनाला भिडत आहेत. किचनमधील गॅस वाचवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. स्वंयपाक करण्याच्या पद्धतीत छोटे छोटे बदल करून तुम्ही गॅस वाचवू शकता. (Cooking Hacks)
योग्य पद्धतीनं बर्नरचा वापर करा
नेहमी अशा बर्नरची निवड करा जे मोठ्या आकाराचं असेल. मोठ्या बर्नरवर छोटी भांडी ठेवल्यामुळे गॅस वाया जातो. कारण जास्त उष्णता बाहेर येते. याऊलट छोट्या बर्नरवर मोठं भांडं ठेवल्यानं अन्न शिजायला जास्त वेळ लागतो आणि गॅस जास्त जातो. म्हणून योग्य आकाराच्या बर्नरची निवड करा ज्यामुळे गॅसची बचत होईल.(LPG Gas Cylinder Saving Hacks)
एकत्र जास्त अन्न शिजवा
एकावेळी जास्त अन्न शिजवणं किंवा थोड्या थोड्या प्रमाणात अन्न शिजवण्यापेक्षा परिणामकारक ठरू शकतं. कढी, भाज्या, डाळी यांसारखे पदार्थ दुसऱ्या दिवशीही चांगले राहतात आणि स्वादीष्ट लागतात.
केस विरळ तर झालेच, सहा महिन्यात वाढलेलेही नाहीत? २० रूपयांत करा हे घरगुती हेअर टॉनिक-पाहा कमाल
बर्नर स्वच्छ ठेवा
घाणेरडं गॅस बर्नर ज्वाला बाहेर निघण्याच्या प्रवाहात अडथळा आणू शकते. जर आग व्यवस्थित बाहेर येत नसेल आणि गॅस जास्त खर्च होत असले तर गॅसचं बर्नर नियमित स्वरूपात स्वच्छ करा.
प्रेशर कुकरचा वापर
प्रेशर कुकरचा वापर करणं गॅस वाचवण्याचा एक उत्तम उपाय आहे. कुकरच्या आतील वाफ आणि दबाव वेगानं अन्न शिजण्यास प्रभावी ठरतो. डाळ, तांदूळ, यांसारखे पदार्थ कुकरमध्ये शिजवणं उत्तम ठरतं. ज्यामुळे गॅस आणि वेळ दोन्हींची बचत होते.
काम करताना या गोष्टींची काळजी घ्या.
१) अन्न शिजवताना त्यावर नेहमी झाकण ठेवा. यामुळे वाफेवर अन्न लवकर शिजते आणि जवळपास १५ आणि २० टक्के गॅस वाचतो.
२) डाळ, भात किंवा कठणी भाज्यांसाठी प्रेशर कुकरचा वापर करा. हे पातेल्यांतील शिजवण्यापेक्षा खूप कमी वेळ आणि गॅस घेते.
पोट सुटलं-कंबरही वेडंवाकडं बेढब दिसतंय? १ पारंपरिक उपाय- वाढलेली चरबीही घटू लागेल झरझर
३) गरजेपेक्षा जास्त पाणी घातल्यास ते आटवण्यासाठी जास्त गॅस खर्च होतो. डाळी किंवा कडधान्य शिजवण्यापूर्वी किमान १ तास कोमट पाण्यात भिजत घातल्यास निम्म्या वेळेत शिजतात.
४) दूध, भाज्या किंवा पीठ फ्रिजमधून काढल्या काढल्या लगेच गॅसवर ठेवू कना. ते आधी सामान्य तापमानाला येऊ द्या मगच गरम करा.
