Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा घरीच पिकत घालण्याची बघा एकदम सोपी पद्धत, भुसा- पोते आणि पेटीचीही गरज नाही, आंबे पिकतील मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2026 13:12 IST

How to Ripen Raw Mangoes at Home?: घरीच पिकविण्यासाठी तुम्ही कैऱ्या आणल्या असतील तर उत्तम पद्धतीने त्या कशा पिकवायच्या पाहा...(simple method to ripe mangoes at home)

ठळक मुद्देआपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या किंवा सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या वस्तू वापरून आंबे कसे पिकवायचे ते पाहुया..

आता सगळीकडे भरपूर आंबे आलेले आहेत. तसेच ज्यांच्याकडे आंब्याचं झाड आहे त्यांच्या झाडांची फळंही मोठी झाली आहेत. त्यामुळे ताे आंबा उतरवून पिकत घालण्याचे दिवस सध्या आहेत. आणि तसंही हल्ली आंबे वेगवेगळी रसायने वापरून पिकवली जातात, असं आपण नेहमीच ऐकतो. त्यामुळे असे आंबे खाण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे खाण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे मग खूप जण बाजारातून कैऱ्या घेऊन येतात आणि त्या घरी पिकवतात. काही जणांना ते खूप उत्तम जमतं (How to Ripen Raw Mangoes at Home?). तर काही जणांचे घरी पिकत घातलेले आंबे पार सडून जातात. हे टाळायचं असेल तर आंबे घरच्याघरी कसे पिकत घालायचे ते पाहा...(simple method to ripe mangoes at home)

 

आंबे घरीच पिकत कसे घालावे?

आंबे पिकत घालण्यासाठी लाकडी पेट्या, पोते, भुसा, गव्हाचं चापट अशा कोणत्याही साधनाची गरज नाही. शिवाय हल्ली शहरी भागात या गोष्टी सहजासहजी मिळतंही नाहीत. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या किंवा सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या वस्तू वापरून आंबे कसे पिकवायचे ते पाहुया..

जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

सगळ्यात पहिली आणि सोपी पद्धत म्हणजे वर्तमानपत्राचा कागद वापरणे. यासाठी एखादं पसरट भांडं किंवा टोपलं घ्या. तुमच्याकडे दुरडी असेल तर अधिक चांगलं. त्यामध्ये सगळ्यात खाली वर्तमान पत्र पसरवून एक जाड थर द्या. आंबे खूप असतील तर जमिनीवर सतरंजी टाका आणि त्यावर वर्तमान पत्र पसरवून ठेवा. त्यावर एकेक आंबा लावून ठेवा. आता वरूनही वर्तमान पत्र पसरवून टाका. 

 

तुम्ही ठेवलेल्या आंब्यांना कुठूनही हवा लागणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही आंब्याचा कोणताही भाग उघडा तर राहिलेला नाही ना याची काळजी घ्या. आता यानंतर त्यावर एक जाडसर कपडा घाला.

वजन जास्त असो किंवा कमी- नो टेन्शन...५ लक्षणं तुमच्यात दिसली तर तुम्ही आहात एकदम फिट ...

चादर, बेडशीट घातलं तरी चालेल. आता हे आंबे ४ ते ५ दिवस तसेच राहू द्या. त्यानंतर आंबे पिकायला सुरुवात होते. रोज आंबे पिकले आहेत का हे तपासा आणि पिकलेले आंबे बाजुला काढत चला.. 


 

English
हिंदी सारांश
Web Title : Simple method to ripen mangoes at home without special equipment.

Web Summary : Ripen mangoes naturally at home using newspaper. Layer mangoes in newspaper, cover with cloth, and check daily. No special equipment needed!
टॅग्स :आंबासोशल व्हायरलसमर स्पेशलफळे