lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > टॉयलेट हॅन्ड जेट शॉवर स्प्रे ब्लॉक झाले? गंजून काळे पडले? बेकिंग सोड्याचा १ उपाय - झटपट चकाचक स्वच्छता

टॉयलेट हॅन्ड जेट शॉवर स्प्रे ब्लॉक झाले? गंजून काळे पडले? बेकिंग सोड्याचा १ उपाय - झटपट चकाचक स्वच्छता

How To Remove Rust From Bathroom Water Spray? : 'या' स्वस्त गोष्टीने टॉयलेट हॅन्ड जेट शॉवर स्प्रे होईल मिनिटात क्लिन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 01:25 PM2024-05-08T13:25:49+5:302024-05-08T13:27:00+5:30

How To Remove Rust From Bathroom Water Spray? : 'या' स्वस्त गोष्टीने टॉयलेट हॅन्ड जेट शॉवर स्प्रे होईल मिनिटात क्लिन..

How To Remove Rust From Bathroom Water Spray? | टॉयलेट हॅन्ड जेट शॉवर स्प्रे ब्लॉक झाले? गंजून काळे पडले? बेकिंग सोड्याचा १ उपाय - झटपट चकाचक स्वच्छता

टॉयलेट हॅन्ड जेट शॉवर स्प्रे ब्लॉक झाले? गंजून काळे पडले? बेकिंग सोड्याचा १ उपाय - झटपट चकाचक स्वच्छता

आजकाल अनेकांच्या घरात वेस्टर्न टॉयलेटचा वापर होतो (Western Toilet). वेस्टर्न टॉयलेटमध्ये कमोड आणि हॅन्ड जेट शॉवर स्प्रे वापरला जातो. स्प्रेचा वापर दररोज केला जातो (Jet Spray Cleaning). पण अधिक काळ याचा वापर केल्याने हॅन्ड जेट शॉवर स्प्रे ब्लॉक होते, किंवा त्यातून पाणी येणं बंद होतं (Cleaning Tips). हे गंजामुळे किंवा क्षारयुक्त पाण्यामुळे ब्लॉक होते. यामुळे स्प्रेमधून पाणी नीट येत नाही अडकून राहते.

जेट स्प्रे साफ करण्यासाठी आपल्याला प्लंबरला बोलवावे लागते, ज्यामुळे आपला खर्चही वाढतो. जर आपल्याला प्लंबरला न बोलावता, घरीच हॅन्ड जेट शॉवर स्प्रे स्वच्छ करायचं असेल तर, फक्त इनोचा वापर करा. इनोच्या वापराने हॅन्ड जेट शॉवर स्प्रेवरील गंजाचे डाग स्वच्छ होतील, शिवाय ब्लॉक झालेलं स्प्रे पुन्हा नव्याने काम करेल(How To Remove Rust From Bathroom Water Spray?).

किचनमध्ये झुरळांची फौज? बेकिंग सोडा - लवंगांचा सोपा उपाय - मिनिटात झुरळं गायब - घर दिसेल स्वच्छ

हॅन्ड जेट शॉवर स्प्रे कसे स्वच्छ करावे?

- हॅन्ड जेट शॉवर स्प्रे स्वच्छ करण्यासाठी एक प्लास्टिकची पिशवी घ्या. ती पिशवी उघडा, त्यात एक चमचाभर इनो घाला. नंतर त्यात एक कप व्हिनेगर घालून मिक्स करा. आता प्लास्टिकच्या पिशवीत हॅन्ड जेट शॉवर स्प्रे घालून, घट्ट गाठ बांधा.

टपरीवर मिळतात तशी टम्म फुगलेली बटाट्याची भजी करायची आहेत? पिठात घाला ‘हा’ पदार्थ, खा कुरकुरीत भजी

- एक तासासाठी हॅन्ड जेट शॉवर स्प्रे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तसेच ठेवा. तासाभरानंतर टूथब्रशने हॅन्ड जेट शॉवर स्प्रे स्वच्छ घासून काढा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या

हॅन्ड जेट शॉवर स्प्रे स्वच्छ करण्यासाठी दुसरी ट्रिक

हॅन्ड जेट शॉवर स्प्रे बेकिंग पावडरच्या मदतीनेही स्वच्छ करता येऊ शकते. यासाठी एका बाऊलमध्ये बेकिंग पावडर, डिशवॉशिंग लिक्विड आणि व्हाईट व्हिनेगर समप्रमाणात घेऊन मिक्स करा. काही वेळ जेट स्प्रे मिश्रणात बुडवून ठेवा. नंतर ब्रशने स्वच्छ घासून काढा, व पाण्याने धुवून घ्या. 

Web Title: How To Remove Rust From Bathroom Water Spray?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.