lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट

कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट

Cleaning Tips For Ink Stain On Clothes: लहान मुलांच्या कपड्यांवर किंवा पुरुषांच्या खिशाला नेहमीच शाईचे डाग (ink stain) पडतात. हे डाग स्वच्छ करण्यासाठी हे बघा काही सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2023 12:43 PM2023-01-02T12:43:19+5:302023-01-02T13:57:34+5:30

Cleaning Tips For Ink Stain On Clothes: लहान मुलांच्या कपड्यांवर किंवा पुरुषांच्या खिशाला नेहमीच शाईचे डाग (ink stain) पडतात. हे डाग स्वच्छ करण्यासाठी हे बघा काही सोपे उपाय

How to remove ink stain on clothes? 3 simple home remedies to remove ink stain and make your clothes clean | कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट

कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट

Highlightsकपड्यांवरचे शाईचे डाग काढण्याचे हे काही उपाय माहिती करून घेणं कधीही उपयोगी पडू शकतं. 

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या कपड्यांवर, रुमालावर नेहमीच शाईचे डाग पडलेले असतात. त्यात जर पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म असेल तर हे डाग खूपच स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे मग हे डाग स्वच्छ करणं, हे दर आठवड्याला त्यांच्या आईचं ठरलेलं काम. मुलांच्याच नाही तर पेन खिशाला लावण्याच्या सवयीमुळे अनेक पुरुषांच्या शर्टच्या खिशालाही कधी कधी शाईचा डाग (ink stain on clothes) पडतो आणि मग चांगला शर्ट खराब होतो. म्हणूनच कपड्यांवरचे शाईचे डाग काढण्याचे (How to remove ink stain) हे काही उपाय (3 simple home remedies) माहिती करून घेणं कधीही उपयोगी पडू शकतं. 

कपड्यांवरचे शाईचे डाग काढण्याचे उपाय
१. व्हिनेगर आणि कॉर्नफ्लोअर

व्हाईट व्हिनेगर आणि कॉर्नफ्लोअर  यांचा एकत्रित उपयोग करून कपड्यांवरचे शाईचे डाग काढून टाकता येतात. त्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे कॉर्नफ्लोअर घ्या. ते भिजून त्याची थोडी घट्ट पेस्ट होईल, एवढं व्हिनेगर त्यात घाला.

फक्त ३ पदार्थ वापरून घरच्याघरी तयार करा पेरुची जेली, चव अशी की विकतचे जॅम- जेली विसराल 

या मिश्रणाची पेस्ट करून ती शाईच्या डागांवर लावा. ४ ते ५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि त्यानंतर ब्रशने घासून डाग स्वच्छ करा. डाग निघाले नाही, तर हीच प्रक्रिया पुन्हा करा. 

 

२. नेलपेंट रिमुव्हर
नेलपेंट काढण्यासाठी असणाऱ्या रिमुव्हरचा वापर करूनही तुम्ही शाईचे डाग स्वच्छ करू शकता. यासाठी लिक्विड प्रकारातले नेलपेंट रिमुव्हर वापरावे.

सतत डोकं दुखतं- सारखं ठणकतं? करून बघा ३ उपाय, पेनकिलर घेण्यापेक्षा कधीही उत्तम पर्याय

शाईच्या डागांवर थोडेसे रिमुव्हर शिंपडा आणि कापसाने अलगद तिथल्या तिथे ते पुसून घ्या. 

 

३. मीठ आणि बेकिंग सोडा
हा उपाय करण्यासाठी मीठ, बेकिंग सोडा सम प्रमाणात घ्या.

तडकेवाला गाजर हलवा... एकदा खायलाच हवा, बघा या अस्सल पंजाबी पदार्थाची व्हायरल रेसिपी

त्यात दोन ते तीन थेंब किंवा मीठ आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण भिजेल एवढे डिश वॉश लिक्विड टाका. हे मिश्रण डागांवर लावून ब्रशने घासून घ्या. डाग चटकन स्वच्छ होतील. 


 

Web Title: How to remove ink stain on clothes? 3 simple home remedies to remove ink stain and make your clothes clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.