Join us

नारळ फोडणं अवघड, खोबरं काढणं कठीण वाटतं? १ भन्नाट ट्रिक, खोबरं काढण्याची सोपी युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2023 16:27 IST

How To Open A Coconut : खोबरं तर स्वयंपाकात लागतंच पण नारळ फोडून खोबरं काढणं अवघड, तेच काम करा या एका युक्तीने सोपं.

महाराष्ट्रातील अनेक पदार्थांमध्ये खोबऱ्याचा (Coconut) वापर होतो. खोबऱ्याचं वाटण घालताच पदार्थाची चव वाढते. खोबऱ्याचे अनेक पदार्थ केले जातात. पदार्थांमध्ये खोबऱ्याचं वाटण, खोबऱ्याची चटणी, खोबऱ्याचे लाडू, खोबऱ्याची चिक्की, यासह अनेक पदार्थ खोबऱ्याचा वापरून केले जातात. पण मुख्य काम नारळ तोडण्यापासून सुरु होते. नारळ फोडण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. शिवाय काही नारळ सहसा लवकर फुटत नाही. त्याला अपटावा लागतो, किंवा त्यावर कोयता किंवा हातोड्याने वार देऊन फोडावा लागतो.

नारळ जर सहसा लवकर फुटत नसेल तर, एका ट्रिकचा वापर करून पाहा, या ट्रिकमुळे नक्कीच नारळ फुटेल, शिवाय खोबरं करवंटीमधून लवकर निघेल (Trick to Open Coconut). नारळ लवकर फोडण्यासाठी कोणती ट्रिक उपयोगी पडेल? खोबरं करवंटीमधून काढण्यासाठी काय करावे? पाहूयात(How To Open A Coconut).

नारळ फोडण्याची सोपी ट्रिक

एक कप चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना

नारळाचा पुरेपूर वापर होतो. खोबरं, करवंटी, नारळाचे पाणी, नारळाच्या शेंड्यांचाही वापर होतोच. त्यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. पण नारळ फोडताना नाकीनऊ येतात. नारळ फोडण्यासाठी आपण काही ट्रिकचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम, नारळाच्या शेंड्या काढून घ्या. आता लाटणं, हातोडा किंवा कोयत्याने नारळावर असलेल्या रेषांवर झोरात मार द्या, व नारळ फोडा. नारळ फुटल्यानंतर त्यातील पाणी एका ग्लासमध्ये काढून घ्या.

करवंटीमधून खोबरं काढण्यासाठी टीप

२ कप दूध-२ ब्रेड स्लाईज, गोड खाण्याची इच्छा झाली तर, करा गोड इन्स्टंट रबडी, करायला सोपी आणि चव जबरदस्त

नारळ फोडल्यानंतर करवंटीमधून खोबरं लवकर निघत नाही. अशा वेळी एका ट्रिकची आपल्याला मदत होऊ शकते. यासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवा. त्यावर करवंटी ठेवा. ३० ते ३५ सेकंदानंतर खालच्या बाजूने करवंटी शेकून घ्या. गॅसवर करवंटी ठेवल्याने त्यातील ओलावा कमी होईल. शिवाय त्यातून खोबरं काही सेकंदात निघेल. आपण करवंटीमधून खोबरं काढण्यासाठी चाकूचा देखील वापर करू शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल