lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > उन्हाळ्यात साप जास्त निघतात? ३ सोप्या सुगंधी टिप्स, साप अंगणात-घरात फिरणार नाहीत

उन्हाळ्यात साप जास्त निघतात? ३ सोप्या सुगंधी टिप्स, साप अंगणात-घरात फिरणार नाहीत

How to Keep Snakes Away from Your Home This Summer : सापाला सगळे घाबरतात, पण सर्प 'या' काही विशिष्ट गंधाला घाबरतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 10:02 AM2024-03-29T10:02:39+5:302024-03-29T10:05:02+5:30

How to Keep Snakes Away from Your Home This Summer : सापाला सगळे घाबरतात, पण सर्प 'या' काही विशिष्ट गंधाला घाबरतो..

How to Keep Snakes Away from Your Home This Summer | उन्हाळ्यात साप जास्त निघतात? ३ सोप्या सुगंधी टिप्स, साप अंगणात-घरात फिरणार नाहीत

उन्हाळ्यात साप जास्त निघतात? ३ सोप्या सुगंधी टिप्स, साप अंगणात-घरात फिरणार नाहीत

सापाचे (Snakes) नाव घेताच अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो. शिवाय सापांना बघितल्यावर तर विचारू नका. सापाला फक्त मानव नसून, इतर प्राणी देखील घाबरतात. साप जरी रस्त्यात्त्या कडेतून गेला तरी, आपली नजर तिथून हटत नाही. साप नकळत चावल्यावर विषबाधा होईल यामुळे आपण जीव मुठीत घेऊन राहतो (Social Viral). सापाला घाबरणारा वर्ग मोठा आहे.

पण साप कशाला, कुणाला घाबरतो हे आपल्याला ठाऊक आहे का? सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने सर्प कोणाला घाबरते असा प्रश्न विचारला?त्यावर अनेकांनी उत्तरं दिली आहेत. युजर्सनी दिलेल्या माहितीनुसार साप घाबरतो तो एका विशिष्ट वासाला. या गंधाची गोष्ट खरंतर तुमच्याच घरात आहे(How to Keep Snakes Away from Your Home This Summer).

सापाला कोणता गंध आवडत नाही?

- सापाला प्रत्येक व्यक्ती घाबरते. पण साप काही विशिष्ट गंधाला घाबरतात. पहिलं म्हणजे केरोसीन किंवा रॉकेल याचा गंध साप सहन करू शकत नाही. याच्या उग्र गंधामुळे साप त्या ठिकाणाहून पळ काढतात.

उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावे? शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून काय खावे? तज्ज्ञ सांगतात..

- अॅनिमल वेबसाईट एज़-अॅनिमल यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये लसूण आणि कांद्याच्या गंधाला देखील साप घाबरत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

- अमोनिया गॅसचा वासही सापाला सहन होत नाही. काही वेळा धूर करूनही सापांना पळवून लावता येऊ शकते. यामुळे सापांना पळवून लावणे सोपे होईल.

- बऱ्याचदा साप भारतीय मसाल्यांच्या गंधाला देखील घाबरते. दालचिनी, लवंग, लिंबू आणि व्हिनेगर या साहित्यांचे उग्र गंध साप सहन करू शकत नाही. त्यामुळे साप दिसल्यास या वस्तूंचा वापर करा.

मूत्रपिंडाचे विकार टाळा, प्या एक आयुर्वेदिक काढा! किडनी डिटॉक्सचा सोपा घरगुती उपाय

- अनेकांच्या दारात, बाल्कनीत असलेली तुळस यालाही साप घाबरते. म्हणून गावाकडे दाराबाहेर तुळस ठेवली जाते. काही विशिष्ट खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा पुदिना याचा वासही सापाला सहन होत नाही. आपण याचेही रोप बाल्कनीत लावू शकता. 

Web Title: How to Keep Snakes Away from Your Home This Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.