Join us

पाऊस पडताच घरभर माशा आणि चिलटं? ५ साेपे उपाय- माशा, चिलटं घरातून पळून जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 17:20 IST

How To Get Rid Of House Flies And Insects: पावसाळा सुरू झाला की घरभर माशांचा आणि चिलटांचा उच्छाद सुरू होतो. तो कमी करण्यासाठीच हे काही उपाय (5 natural remedies to make your house free from flies and insects)

ठळक मुद्देघरात चिलटं आणि माशा होण्याचं कारण म्हणजे घरातला ओलसरपणा. याची सगळ्यात जास्त काळजी स्वयंपाक घरातच घ्यावी लागते.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असूनही महाराष्ट्रात सर्वत्रच रोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतं. आता अजून काही दिवस असा पाऊस असणार, असं हवामान खातं सांगत आहे आणि त्यानंतर तर पावसाळा सुरू होणारच आहे. आता पाऊस सुरू झाला की त्यापाठोपाठ घरभर माशा घोंगावू लागतात. माशांसोबतच चिलटांचा उच्छादही वाढतो. सध्याही रोज पाऊस पडतो आहे त्यामुळे माशा आणि चिलटं झालेली अनेक घरांमध्ये दिसत आहेत (how to get rid of house flies and insects?). चिलटं आणि माशांना वैतागून गेले असाल तर लगेचच हे काही उपाय करायला सुरुवात करा (home hacks to remove flies from house). जेणेकरून तुमच्या घरातून ते कायमचे निघून जातील.(5 natural remedies to make your house free from flies and insects)

 

घरभर फिरणाऱ्या माशा आणि चिलटं कशी कमी करावी?

१. घरात चिलटं आणि माशा होण्याचं कारण म्हणजे घरातला ओलसरपणा. याची सगळ्यात जास्त काळजी स्वयंपाक घरातच घ्यावी लागते. काम झाल्यानंतर स्वयंपाक घरातल्या फरशा, सिंक, ओटा, डायनिंग टेबल सगळं स्वच्छ पुसून कोरडं करून घ्या. तिथे जर ओलसरपणा आणि खरकटे अन्न राहिले तर त्याच्या आजुबाजुला लगेच माशा आणि चिलटं घोंगावू लागतात.

भारी आयडिया!! पावसाळ्यात लाईट गेल्यावर 'हा' उपाय करा, बाटलीभर पाण्यामुळे घरभर उजेड पसरेल 

२. ओला कचरा ज्या ठिकाणी ठेवलेला असतो तिथेही खूप माशा होतात. त्यामुळे शक्य असेल तर स्वयंपाक घरात आणि घरात कुठेही ओला कचरा ठेवू नका. ओल्या कचऱ्यासाठी झाकण असणारे डस्टबिन वापरा. माशा आणि चिलटांचं प्रमाण बरंच कमी होईल.

 

३. फळांच्या अवतीभोवतीही खूप चिलटं फिरतात. त्यामुळे कोणतेही फळ उघडे ठेवू नका. फळांसाठी असणाऱ्या जाळीदार बास्केटमध्येच ती ठेवा.

शर्ट स्वच्छ पण कॉलर मळालेली? घ्या उपाय- १ मिनिटात काळपटपणा जाऊन कॉलर होईल स्वच्छ

४. कापूर, लवंग, तेजपान, दालचिनी हे पदार्थ एकत्र करा आणि त्यांचा धूर घरभर फिरवा. दिवसातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास घरभर फिरणारे चिलटं आणि माशा खूप कमी झालेल्या दिसतील. 

५. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये रोज थोडे मीठ, व्हिनेगर तसेच बेकिंग सोडा घालून फरशा पुसा. यामुळेही माशा आणि चिलटांचे प्रमाण बरेच कमी होते. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलकिचन टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडीफळे