lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > घरभर माश्यांचा हैदोस? ४ भन्नाट उपाय, भिरभिरणाऱ्या माश्या होतील गायब

घरभर माश्यांचा हैदोस? ४ भन्नाट उपाय, भिरभिरणाऱ्या माश्या होतील गायब

How to Get Rid of House Flies (4 Simple Steps) पावसाळ्यात घरात माश्यांचा उपद्रव होतोच, तो टाळायचा तर करा ४ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 09:08 PM2023-06-19T21:08:03+5:302023-06-19T21:08:56+5:30

How to Get Rid of House Flies (4 Simple Steps) पावसाळ्यात घरात माश्यांचा उपद्रव होतोच, तो टाळायचा तर करा ४ उपाय

How to Get Rid of House Flies (4 Simple Steps) | घरभर माश्यांचा हैदोस? ४ भन्नाट उपाय, भिरभिरणाऱ्या माश्या होतील गायब

घरभर माश्यांचा हैदोस? ४ भन्नाट उपाय, भिरभिरणाऱ्या माश्या होतील गायब

पावसाळा सुरु झाला की, घरात कीटकांचा वावर सुरु होतो. त्यात सर्वात त्रासदायक माश्या ठरतात. माश्या दिवसभर घरात घोंघावत बसतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची चिडचिड होणे साहजिक आहे. अशा वेळी घरातील अन्नावर, साठवलेल्या पाण्यावर माश्या घोंघावतात. हे अन्न व पाणी प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होते.

त्रासदायक माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर करून पाहा. या उपायांमुळे नक्कीच माश्या पळून जातील. व पुन्हा घरात शिरणार नाही. घर हायजीन ठेवायचं असेल तर, घरातून माश्या पळवून लावायला हवे. यासाठी हे उपाय नक्की मदत करतील(How to Get Rid of House Flies - 4 Simple Steps).

कापूर

माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण कापराचा वापर करू शकता. यासाठी १० ते १२ कापूर घ्या, त्याची बारीक पावडर तयार करा. एक लिटर पाणी घ्या, त्यात कापराची पावडर मिक्स करा. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यानंतर घरात ज्या ठिकाणी माश्या जास्त दिसतात त्या ठिकाणी फवारणी करा.

प्लास्टिक डिस्पोजेबल बॉक्स वापरून झाल्यानंतर फेकून देता? ४ भन्नाट वापर, किचन राहील स्वच्छ

व्हिनेगर

घरातून माश्या पळवून लावण्यासाठी व्हिनेगरचा वापर करा. यासाठी एका वाटीत ॲपल सायडर व्हिनेगर घ्या, त्यात १० - १२ थेंब निलगिरी तेल मिसळा. नंतर हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून घरात सर्वत्र स्प्रे करा. स्प्रेच्या उग्र वासामुळे घरात माश्या येणार नाहीत.

तुळशीची पानं

घरातील माश्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने उपयुक्त ठरतील. यासाठी तुळशीची काही पाने घेऊन त्याची पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरा. या मिश्रणाची दिवसातून दोनवेळा घरामध्ये फवारणी करा.

स्वयंपाकघरात कोळ्यांची जळमटं सतत लागतात? ५ टिप्स- जाळीजळमटं होतील गायब

मिठाचं पाणी

माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मिठाचे पाणी मदत करेल. यासाठी पाण्यात मीठ मिसळा व हे पाणी स्प्रे बाटलीत भरा. या पाण्याने घरात स्प्रे करा. हवं असल्यास आपण मिठाच्या पाण्याने घरातील फरशी देखील पुसू शकता. यामुळे घरात इतर कीटक येणार नाहीत.

Web Title: How to Get Rid of House Flies (4 Simple Steps)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.