Join us

पोतंभर गहू आणले, पण कीड लागलं तर? ७ टिप्स-वर्षभर गव्हाला कीड लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2024 08:30 IST

How to Get Rid of Grain Beetles (7 Easy Steps) : गहू साठवणूक करताय? मग ७ गोष्टींची विशेष काळजी घ्या, नाहीतर

एप्रिल महिन्यापर्यंत नवीन गहू बाजारात येतात. मार्केटमध्ये नवीन गहू आल्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंब वर्षभर पुरेल इतका गहू विकत आणतो, व स्टोर करून ठेवतो (Cooking Tips and Tricks). परंतु अनेकदा योग्यरित्या साठवण अभावी गहू धान्याला कीड लागते. ज्यामुळे गव्हाचे मोठे नुकसान होते. शिवाय धान्याची नासाडी होते ते वेगळच (Kitchen Tips). साठवणुकीच्या वेळेस योग्यरीत्या गहू स्टोर केले तर, लवकर खराब होत नाही.

आरामात वर्षभर टिकतात (Grain Beetles). जर आपण वर्षभरासाठी घरात गहू साठवून ठेवत असाल तर, साठवताना ७ गोष्टींची काळजी घ्या, व या काही टिप्सचची मदत घ्या. यामुळे गव्हाला कीड लागणार नाही, लवकर खराब होणार नाही. शिवाय महिनोमहिने आरामात टिकेल. गव्हाला कीड न लागावी म्हणून कोणती काळजी घ्यावी पाहूयात(How to Get Rid of Grain Beetles (7 Easy Steps)).

गव्हाला कीड लागू नये म्हणून..

साठवणुकीची पद्धत चुकली की, गव्हालाच नसून इतर धान्यांनाही कीड लागते. प्रामुख्याने गव्हात जर आद्रतेचे प्रमाण जास्त असेल तर, गहू लवकर खराब होतात.

'शैतान' फेम ज्योतिकाचं साधं सोपं फिटनेस सिक्रेट; तिचे वय किती? विश्वास नाही बसणार..

- यासाठी गहू बाजारातून आणल्यावर दोन ते तीन दिवस कडक उन्हात चांगले वाळत घाला. यामुळे गव्हातील आद्रता पूर्ण नष्ट होईल व कीड लागण्याची शक्यता कमी होईल.

- गहू वळत घातल्यानंतर जागेचा प्रश्न येतो. गहू साठवणूक करण्यासाठी ओलावा मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करा.

- गहू साठवण्यासाठी लोखंडी किंवा सिमेंटपासून बनवलेल्या कोठीचा वापर करा. शक्यतो प्लास्टिकमध्ये स्टोर करणे टाळा. असे केल्याने धान्य साठवणुकीच्या कोठीला कीड, उंदीर आणि ओलावा लागणार नाही.

- गव्हाला आतून कीड लागू नये म्हणून, स्टोर करताना त्यात कडूलिंबाची वाळलेली पाने ठेवा. याच्या उग्र गंधामुळे धान्याला कीड लागणार नाही.

वजन कमी करणं कठीण वाटतं? हळद आणि आल्याचा करा जबरदस्त उपाय; डाएट-जिमशिवाय घटेल वजन

- याशिवाय बाजारात बोरिक ऍसिड मिळते. याच्या वापरामुळे कुठल्याही धान्याला कीड लागत नाही. एक क्विंटल गव्हासाठी ४०० ग्रॅम बोरिक एसिड पावडरचा वापर करा.

- गहू साठवणुकीसाठी धातूची कोठी जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर, पोती स्वच्छ व साफ करून त्यात गहू भरा. गव्हाने भरलेली पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या कागदावर ठेवा. यामुळे जमिनीवरील ओलाव्यापासून संरक्षण होईल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स