Join us

पाण्याची बाटली रोज नुसती विसळता आणि भरून घेता? आजारपण वाढेल- 'या' पद्धतीने करा स्वच्छता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2025 11:42 IST

How To Clean Water Bottle From Inside?: रोजच्या पाण्याची बाटली रोज नुसतीच विसळून घेत असाल तर थोडं थांबा आणि हे वाचाच..(how to get rid of bad smell from water bottle?)

ठळक मुद्देमहिनोंमहिने फक्त याच पद्धतीने पाण्याची बाटली धुत असाल तर तुम्ही चुकत आहात..

बहुतांश घरं अशी आहेत की त्या घरांमध्ये दररोज एका व्यक्तीला तरी रोजच्या रोज पाण्याची बाटली सोबत घेऊनच घराबाहेर पडावे लागते. ऑफिस, कॉलेज, शाळा याठिकाणी जाणाऱ्या व्यक्तींना रोज पाण्याची बाटली लागतेच. आता मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या वॉटरबॅग किंवा बाटल्या रोजच्या रोज स्वच्छ करणं आणि त्या भरून ठेवणं ही आईच्या मागची कामंही वाढली आहेत (how to clean water bottle?). बऱ्याचदा असं होतं की रोजची पाण्याची बाटली भरण्यापुर्वी ती नुसती पाणी टाकून एकदा विसळून घेतली जाते आणि मग भरली जाते (how to clean water bottle from inside?). पण असं रोजच करत असाल आणि महिनोंमहिने फक्त याच पद्धतीने पाण्याची बाटली धुत असाल तर तुम्ही चुकत आहात.(how to get rid of bad smell from water bottle?)

 

पाण्याची बाटली किती दिवसांनी आणि कशी धुवावी?

पाण्याची बाटली बाहेरून आणि आतूनही दिसायला स्वच्छ वाटत असली तरी तिच्यामध्ये कित्येक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे दर दोन ते तीन दिवसांनी ती बाटली घासण्याचा ब्रश वापरून स्वच्छ करायला हवी. ब्रशचा वापर केल्यामुळे बाटलीच्या आतल्या भागात असणारा चिकटपणा निघून जातो आणि बाटली स्वच्छ होते.

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

आठवड्यातूून एकदा सुटीच्या दिवशी बाटलीमध्ये गरम पाणी आणि थोडे मीठ घाला. बाटलीचे झाकण लावून घ्या आणि ती खाली- वर या पद्धतीने जोरात खळबळून घ्या. यानंतर ब्रशने बाटलीची स्वच्छता करा आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने बाटली व्यवस्थित धुवून घ्या. या पद्धतीने बाटलीची स्वच्छता दर आठवड्याला होणं गरजेचं आहे.

 

बऱ्याचदा लहान मुलांच्या बाबतीत असं होतं की मुलं पाण्याची बाटली शाळेतून घरी आणल्यानंतर रिकामी करून ठेवत नाहीत. ती बाटली थेट दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याआधीच उघडली जाते आणि काही मिनिटांतच पाणी भरून पुन्हा तिचं झाकण लावलं जातं.

तुमचंही सारखं डोकं दुखतं- ॲसिडीटी वाढते? फक्त ५ दिवस 'हा' उपाय करा, त्रास कायमचा संपेल.. 

अशी दिवसरात्र बंद असणारी बाटली आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. पाण्याची बाटली घरी आल्यानंतर रिकामी करा आणि ती काही तास झाकण न लावता तशीच उघडी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ती विसळून घ्या आणि मगच तिच्यामध्ये पाणी भरा. कारण सतत बंद असणारी बाटली खूप कोंदट होते आणि तिच्यातून कुबट वास येऊ लागतो. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडीपाणीशाळालहान मुलं