Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > चहाच्या गाळणीवर काळाकुट्ट थर आलाय? ३ उपाय, न घासता कळकट गाळणी दिसेल नवीकोरी

चहाच्या गाळणीवर काळाकुट्ट थर आलाय? ३ उपाय, न घासता कळकट गाळणी दिसेल नवीकोरी

How To Clean Tea Strainer At Home : चहाची गाळणी स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:35 IST2026-04-06T18:29:39+5:302026-04-06T18:35:14+5:30

How To Clean Tea Strainer At Home : चहाची गाळणी स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती पाहूया.

How To Clean Tea Strainer At Home : How To Clean Tea Strainer 3 Easy Ways | चहाच्या गाळणीवर काळाकुट्ट थर आलाय? ३ उपाय, न घासता कळकट गाळणी दिसेल नवीकोरी

चहाच्या गाळणीवर काळाकुट्ट थर आलाय? ३ उपाय, न घासता कळकट गाळणी दिसेल नवीकोरी

चहा गाळण्याची गाळणी ही रोजच्या वापरासाठी वस्तू आहे. रोज वापरल्यानंतर चहाची गाळणीची व्यवस्थित स्वच्छता केली नाही तर त्यावर काळे थर जमा होऊ लागतात आणि जुनाट, घाण दिसू लागते. इतकंच नाही तर चहाची गाळणी काळी, चिकट होते. दूध किंवा तूप गाळल्यामुळे यावर चिकटपणाही येतो. अशावेळी काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर काही मिनिटांतच तुम्ही गाळणी स्वच्छ साफ करू शकता. चहाची गाळणी स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती पाहूया. (How To Clean Tea Strainer At Home)

गरम पाणी आणि डिटर्जंट

गाळणीवर जमा झालेली घाण साफ करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घेऊन पाणी गरम करून घ्या. त्यात गाळणी थोड्या वेळासाठी घालून ठेवा. यात थोडा भांडी घासण्याचा साबण किंवा डिटर्जंट पावडर घाला. नंतर गॅस बंद करा. या पाण्यात ब्रश बुडवून गाळणी घासून स्वच्छ करा.

 लिंबाचा रस आणि डिटर्जेंटनं साफ करा

 चहाची गाळणी किंवा पीठ गाळण्याची गाळणी काहीही साफ करण्यासाठी तुम्ही हे मिश्रण वापरू शकता. कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि डिटर्जंट पावडर मिसळा. या द्रावणात गाळणी थोडावेळ बुडवून ठेवा. नंतर ब्रशच्या मदतीनं स्वच्छ करा. नंतर साध्या पाण्यात बुडवून स्वच्छ करा. या उपायानं गाळणी चकचकीत स्वच्छ होण्यास मदत होईल.

 बेकींग सोडा आणि व्हिनेगरनं साफ करा

ही गाळणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकींग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. त्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या त्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा कप व्हिनेगर मिसळा. नंतर यात गाळणी बुडवा. थोड्यावेळानं गाळणी ब्रशनं रगडून स्वच्छ करा. 

चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी गॅस स्टोव्ह ऑन करून तुम्ही स्टिलची गाळणी थेट आचेवर ठेवू शकता. यामुळे मिनिटात गाळणीवर जमा झालेली काळी घाण निघून जाईल. गाळणी थंड झाल्यानंतर चमचा किंवा सुरीच्या साहाय्यानं ही घाण काढून टाका.  टुथब्रशवर थोडं लिक्विड डिटर्जेंट घालून तुम्ही गाळणी घासू शकता. या उपायानं काही मिनिटांत गाळणी चकचकीत दिसेल.

Web Title : इन आसान उपायों से चाय की छलनी को नए जैसा साफ करें।

Web Summary : चाय की छलनी से जिद्दी दाग ​​हटाने के लिए गर्म पानी और डिटर्जेंट, नींबू का रस, या बेकिंग सोडा और सिरका का उपयोग करें। ये आसान तरीके जल्दी से चमक बहाल करते हैं।

Web Title : Clean your tea strainer like new with these simple tricks.

Web Summary : Remove stubborn stains from tea strainers easily with hot water and detergent, lemon juice, or baking soda and vinegar. These simple methods restore shine quickly.