lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

How To Clean Kitchen With Curd : आंबट झालेले दही फेकून देण्यापेक्षा त्याचा करा स्मार्ट सोपा वापर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 07:04 PM2023-05-29T19:04:48+5:302023-05-29T19:22:41+5:30

How To Clean Kitchen With Curd : आंबट झालेले दही फेकून देण्यापेक्षा त्याचा करा स्मार्ट सोपा वापर...

How To Clean Kitchen With Curd : | खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

दही हा आपल्या रोजच्या जेवणातला महत्वाचा पदार्थ आहे. चांगल्या आरोग्यासाठी रोज दही खाण गरजेचं असत. दही हे पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु ते दही ताजे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. दही (Curd) हा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत देखील आहे आणि ते दुधापासून बनवले जाते कारण त्यात इतर असंख्य जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. दूधापेक्षा दह्यामध्ये प्रोटीन, लॅक्टोस, कॅल्शियम, विटामिन्स असे पौष्टिक घटक अधिक प्रमाणामध्ये असतात. म्हणून डेली एक छोटी वाटी दही (Curd) खाण्याची स्वतःला सवय लावून घ्यावी. वर उल्लेख केल्याप्रमाणे, दह्यामध्ये मानवी शरीराला आवश्यक असलेले सर्व घटक आढळले जातात. त्यामुळे दह्याचे सेवन करणे योग्य मानले जाते.

दही हे अनेक बहुगुणांनी सर्वसंपन्न असते. दह्याचा वापर आपण जेवणाशिवाय इतर अनेक गोष्टींसाठी करू शकतो. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण दह्याचे विविध फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावतो. तसेच तांब्या - पितळेच्या भांड्यांवरील काळा थर काढून टाकण्यासाठी आपण दह्याचा वापर करतो. जास्त वेळ ठेवलेले दही जास्त आंबट होऊन खराब होते. अशा परिस्थितीत ते खाल्ल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे बहुतेक घरात दही आंबट झाले की फेकून दिले जाते. हे आंबट झालेले दही फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर करुन आपण किचन मधल्या अनेक गोष्टींची स्वच्छता करु शकतो. या आंबट झालेल्या दह्याचा आपण नेमका कसा वापर करु शकतो ते पाहूयात(How To Clean Kitchen With Curd).

आंबट झालेले दही फेकून न देता त्याचा नेमका वापर कसा करावा... 

१. दह्याने फरशीवरील तेल-मसाल्याचे डाग काढले जातात :- स्वयंपाक करताना काही वेळा तेल आणि मसाले जमिनीवर पडून त्याचे हट्टी डाग फारशीवरून कितीही घासले तरीही जाता जात नाहीत. त्यातही फरशा पांढऱ्या रंगाच्या असल्यास त्यावरुन हे तेल व मसाल्यांचे डाग हटवणे आणखीनच कठीण होऊन बसते. अशावेळी आपण घरात असलेल्या आंबट दह्याचा वापर करु शकता. यासाठी डाग पडलेल्या भागावर दही लावा आणि काही वेळ ते तसेच राहू द्या. त्यानंतर दह्याच्या पाण्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळा आणि ब्रशच्या मदतीने हे मिश्रण डागांवर लावून घासून घ्यावे. आता स्वच्छ ओल्या कापडाने फरशी स्वच्छ पुसून घ्यावी. 

किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...

२. चिकट टाइल्स-कॅबिनेट स्वच्छ करा :- स्वयंपाकघरातील अन्नपदार्थांच्या चिकट वाफेमुळे तसेच तेल आणि मसाल्यांमुळे गॅसच्या आजूबाजूच्या फरशा आणि कॅबिनेट खूपच चिकट होतात. नुसत्या पाण्याने या चिकट टाइल्स-कॅबिनेट स्वच्छ करणे खूपच अवघड काम असते. अशा परिस्थिती, आपण ते स्वच्छ करण्यासाठी आंबट झालेल्या दह्याचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात आवश्यकतेनुसार दही घ्या आणि त्यात डिटर्जंट घाला. आता ही पेस्ट चिकट टाइल्स-कॅबिनेटवरील हट्टी डागांवर लावा आणि स्पंजने किंवा स्क्रबरने घासून स्वच्छ करा.

 चष्मा स्वच्छ आणि चकाचक ठेवण्यासाठी ३ टिप्स, चष्म्याची काच टिकेल उत्तम-दिसेल स्पष्ट...

३. पितळेची-तांब्याची भांडी दह्याने स्वच्छ करा :- स्टील आणि काचेच्या व्यतिरिक्त, बरेच लोक त्यांच्या स्वयंपाकघरात पितळ आणि तांब्याची भांडी देखील वापरतात. जर आपल्या स्वयंपाकघरात पितळ आणि तांब्याची भांडी असतील तर ती स्वच्छ ठेवण्यासाठी आपण आंबट दह्याचा वापर करु शकता. या तांब्या - पितळेच्या भांड्यांवरील डाग सामान्य डिश वॉशच्या मदतीने सहज काढले जात नाहीत. अशावेळी ते काढण्यासाठी दही हातात घेऊन भांड्यावर घासावे. नंतर सामान्य डिशवॉश किंवा साबणाचा आणि पाण्याचा वापर करुन स्वच्छ धुवावेत. 

४. मसाल्यांच्या बाटल्या दह्याने स्वच्छ कराव्यात :- धूळ आणि वाफेमुळे मसाल्यांच्या बरण्या लवकर घाण होतात. जर या बरण्या वेळोवेळी स्वच्छ केल्या  नाहीत तर संपूर्ण स्वयंपाकघरच अस्वच्छ दिसू लागते. यासाठीच मसाल्यांच्या बरण्या दर दोन-तीन आठवड्यांनी स्वच्छ करणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, चिकट आणि अस्वच्छ झालेल्या मसाल्यांच्या बरण्या स्वच्छ करण्यासाठी, थोड्यावेळासाठी या बरण्या कोमट पाण्यांत बुडवून ठेवा. नंतर दह्यामध्ये बेकिंग सोडा मिसळून  त्याची घट्टसर पेस्ट तयार करून घ्यावी आणि ही पेस्ट स्पंजने मसाल्यांच्या बरण्यांना लावून हलक्या हाताने घासून घ्यावे. काहीवेळासाठी या बरण्या तशाच ठेवून मग सामान्य डिशवॉश किंवा साबणाचा आणि पाण्याचा वापर करुन स्वच्छ धुवून घ्याव्यात.

मळके सॉफ्ट टॉईज धुण्याच्या सोप्या ४ पद्धती, सॉफ्ट टॉईज होतील स्वच्छ, चमकदार...

Web Title: How To Clean Kitchen With Curd :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.