भारतीय घरांमध्ये तांब्याच्या भांड्यांचा वापर पूजा-पाठ आणि धार्मिक कार्यांसाठी केला जातो. तांबे हा धातू फक्त पवित्रतेचे प्रतीक नसून आरोग्याच्या दृष्टीनंही फायदेशीर आहे. (How To Clean Dirty Copper Utensils). तांब्याच्या भांड्याच्या वापरानं तब्येतीवर सकारात्मक परिणाम होतो. पण रोजच्या वापरामुळे घरातील तांब्याची भांडी काळपट होऊ लागतात. (How To Clean Copper Utensils At Home)
चिंचामुळे हरवलेली भांड्यांची चमक पुन्हा येते
तांब्या, पितळाच्या भांड्यांवरील चमक पुन्हा आणण्यासाठी तुम्ही चिंचेचा वापर करू सकता. चिंच पाण्यात भिजवून नंतर भांड्यांवर रगडून घासा. १० मिनिटं भांडं तसंच ठेवा नंतर कोमट पाण्यानं धुवून घ्या. चिंचेतील नैसर्गिक अम्लीय गुण काळेपणा हटवून भांडी पुन्हा चमकवण्यास मदत करतील.
बेकींग सोडा आणि लिंबाचं कॉम्बिनेशन
आजकाल प्रत्येक घरांत सहज उपलब्ध होणारा बेकिंग सोडा तांबा, पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी प्रभावी मानला जातो. १ चमचा बेकींग सोड्यात ३ ते ४ थेंब लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार कर. ही पेस्ट भांड्यावर लावून तसंच ठेवा. काहीवेळांनतर कोमट पाण्यानं भांडी धुवा. या उपायामुळे भांड्यांवरचा काळा थर निघून जाण्यास मदत होईल.
व्हिनेगरनं हटवा काळे डाग
तांब्याच्या भांड्यांच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगर खूपच फायदेशीर ठरते. १ चमचा व्हिनेगरमध्ये लिंबाचे काही थेंब मिसळून द्रावण तयार करा. हे मिश्रण भांड्यांवर लावून काहीवेळ तसंच ठेवा. थोड्या वेळानं भांडी स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे भांड्यांवर जमा झालेला काळेपणा सहज निघून जाईल आणि चमक येईल.
मीठ आणि लिंबांचा पारंपारीक उपाय
जुन्या काळात मीठ आणि लिंबाचा वापर तांब्या, पितळाची भांडी चमकवण्यसाठी केला जायचा. लिंबात मीठ मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट भांड्यांना लावून व्यवस्थित रगडून घ्या. काहीवेळानंतर भांडी स्वच्छ, साफ, चमकदार दिसून येतील.
तांब्याची मोठी भांडी वापरानंतर प्लास्टीक बॅगमध्ये झाकून ठेवा. ज्यामुळे त्यावर काळेपणा येत नाही. तांब्याची भांडी कधीच केमिकल्सयुक्त पावडरने घासू नका. यामुळे भांड्यांवर काळा थर तयार होतो आणि स्वच्छता काही दिवसच टिकते.
Web Summary : Restore shine to copper utensils using tamarind, baking soda with lemon, vinegar, or salt with lemon. These simple home remedies effectively remove tarnish and keep your copperware sparkling clean.
Web Summary : इमली, बेकिंग सोडा और नींबू, सिरका, या नमक और नींबू का उपयोग करके तांबे के बर्तनों की चमक बहाल करें। ये घरेलू उपाय प्रभावी रूप से कालेपन को हटाते हैं और आपके तांबे के बर्तन को साफ रखते हैं।