Lokmat Sakhi >Social Viral > स्किन इन्फेक्शन टाळायचं असेल तर 'इतक्या' दिवसांनी बदला बेडशीट, आळस पडेल महागात

स्किन इन्फेक्शन टाळायचं असेल तर 'इतक्या' दिवसांनी बदला बेडशीट, आळस पडेल महागात

Skin Care Tips : घराची स्वच्छता करण्यासाठी बराच वेळ दिला जातो. पण बेडशीट बदलण्याकडे फारसं कुणी गंभीरतेने बघत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:06 IST2025-07-17T12:04:53+5:302025-07-17T12:06:43+5:30

Skin Care Tips : घराची स्वच्छता करण्यासाठी बराच वेळ दिला जातो. पण बेडशीट बदलण्याकडे फारसं कुणी गंभीरतेने बघत नाहीत.

How Often Should You Change Bed Sheets | स्किन इन्फेक्शन टाळायचं असेल तर 'इतक्या' दिवसांनी बदला बेडशीट, आळस पडेल महागात

स्किन इन्फेक्शन टाळायचं असेल तर 'इतक्या' दिवसांनी बदला बेडशीट, आळस पडेल महागात

Skin Care Tips : लोक आजकाल तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी काहीना काही उपाय सतत करत असतात. हॉस्पिटलमध्ये लागणारा भरमसाठ खर्च आणि आजारापणात जाणारा वेळ यामुळे बरेच लोक आधीच बरीच काळजी घेतात. त्यात पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि हेल्दी लाइफस्टाईल या गोष्टींचा समावेश असतो. पण हे करत असताना रोजच्या वापरातील अशा काही गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात ज्यामुळे आपणं आजारी तर पडतोच, सोबतच त्वचेचंही मोठं नुकसान होतं. अशीच एक बाब म्हणजे बेडशीट. 

घराची स्वच्छता करण्यासाठी बराच वेळ दिला जातो. पण बेडशीट बदलण्याकडे फारसं कुणी गंभीरतेने बघत नाहीत. आपल्याला माहीत नसेल पण बेडशीट थेटपणे आपल्या झोपेला प्रभावित करते. इतकंच नाही तर बेडशीटमुळे तब्येतही बिघडू शकते. त्यामुळे वेळोवेळी बेडशीट बदलायला हवी. पण अनेकांना असाही प्रश्न पडतो की, बेडशीट किती दिवसांमध्ये बदलायला हवी? (How Often Should You Change Bed Sheets) पाहुया यावर हेल्थ एक्सपर्ट काय सांगतात.

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, झोपताना आपल्या शरीरातून घाम, डेड स्किन सेल्स, केस आणि ऑइल बेडशीटवर जमा होऊ लागतं. त्याशिवाय धूळ-मातीही बेडशीटवर जमा होतं. या सगळ्या गोष्टींमुळे बेडशीट घाणेरडी होते. त्यावर घातक बॅक्टेरिया जमा होतात. ज्यामुळे अनेकदा स्किन अॅलर्जी, खाज, अॅक्ने आणि श्वास घेण्यासंबंधी समस्या होऊ शकतात. इतकंच नाही तर सर्दी-खोकला आणि तापही येऊ शकतो.

किती दिवसांनी बदलावी बेडशीट?

एक्सपर्टनुसार, सामान्यपणे बेडशीट आठवड्यातून एकदा बदलायला हवी. जर आपल्याला अधिक घाम येत असेल किंवा बेडवर पाळीव कुत्राही येत असेल तर ३ ते ४ दिवसात बेडशीट बदलायला हवी. उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि त्यामुळे बेडशीट जास्त खराब होते. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. जर जास्त दिवस एकाच बेडशीटचा वापर केला तर त्यात बॅक्टेरिया, धुळीचे कण, फंगल तत्व जमा होतात. 
बेडशीटवरील बॅक्टेरियामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि केसगळतीची समस्याही होते. त्याशिवाय उशीचे कव्हरही लवकर बदलत नसाल तर केसांमध्ये कोंडा, केसगळती आणि ऑयली स्कॅल्पची समस्या होते. स्वच्छ चादर आणि उशीचं कव्हर त्वचेसाठी चांगलं असतं. 

बेडशीट नेहमीच गरम पाण्यात डिटर्जेंट टाकून चांगल्या धुवायला हव्यात. त्यांना जास्तीत जास्त उन्ह मिळावं. उन्हामुळे बेडशीटवरील बॅक्टेरिया नष्ट होतात. प्रत्येक वातावरण बेडशीट नियमितपणे धुतल्या पाहिजे. हेच चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

Web Title: How Often Should You Change Bed Sheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.