बेडवरची चादर तर आपण अनेकदा बदलतो पण गादी साफ करणं खूपच मोठा टास्क वाटतो. अनेकदा गादीवर काही पदार्थ पडले तर त्याचे डाग तसेच राहतात. जर गादी पांढऱ्या रंगाची असेल तर ती जास्तच अस्वच्छ दिसते.गादीवर लागलेले डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता (Home Hacks). ज्यामुळे गादी न धुता स्वच्छ, नीटनेटकी दिसेल. या ट्रिकमध्ये तुम्हाला गादी न धुता स्वच्छ, साफ करता येईल. ही पद्धत अनेक हॉटेल्समध्ये गाद्या स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. (How do Hotels Clean Mattresses Stains)
गादी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक कोणती?
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात कोणतंही लिक्विड सोप किंवा डिटर्जेंट मिसळा. नंतर यात हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळा. फॅब्रिक सॉफ्टरन घालून एक पातळ पेस्ट तयार करा. पाणी जवळपास १ मग असायला हवं. सर्व पदार्थ २-२ चमचे मिसळा. नंतर एका इस्त्रीवर टॉवेल वरून खालपर्यंत बांधून घ्या. तो या मिश्रणात बुडवून इस्त्रीवर फिरवा. इस्त्री गादीवर अशा पद्धतीनं चालवा जसे की तुम्ही प्रेस करत आहात. या उपायानं पिवळेपणा सहज साफ होईल. ही ट्रिक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये गादी साफ करण्यासाठी वापरली जाते.
गादी साफ करण्याची दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा तुम्ही चादर बदलाल तेव्हा वॅक्युम क्लिनरच्या मदतीनं गादी साफ करून घ्या. कारण गादीवर जास्त धुळ जमा झाली तर ती मळकट, घाण दिसू लागते. बॅक्टेरियाज क्लिन करण्याासठी तुम्ही स्टिम वॅक्यूमचाही वापर करू शकता. यामुळे जुनी गादीसुद्धा नव्यासारखी दिसून येईल.
गादीतील जंतू मारण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि पाण्याचे समप्रमाणात मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवून गादीवर हलका स्प्रे करू शकता. यामुळे गादीला फ्रेश वास येतो. जर शक्य असेल तर गादी ३ ते ४ दिवस कडक उन्हात ठेवा. सुर्यप्रकाश हा नैसर्गिक जंतूनाशक आहे. ज्यामुळे गादीमधील ओलावा निघून जातो आणि सुक्ष्म जीव मरतात. गादी नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी मॅट्रेस प्रोटेक्टर वापरा. दर ६ महिन्यांनी गादीची बाजू बदला.
