Join us
Daily Top 2Weekly Top 5

किचन साफ करणं असो की आरसे चमकवणं, १ चमचा कॉर्नस्टार्चचे ६ उपयोग, घर दिसेल चकचकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 18:35 IST

Cornstarch Benefits For Home Cleaning : कॉर्नस्टार्चचा वापर करून तुम्ही किचनचा चिकटपणा काढून टाकू शकता.

आपल्या किचनमध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात ज्यांचा वापर फक्त चव वाढवण्यासाठीच नाही तर इतर घरगुती कामांसाठीही केला जातो (Cornstarch Benefits).  काही पदार्थांचा वापर करून तुम्ही दुर्गंध दूर करू शकता तसंच स्वच्छताही करू शकता. त्यापैकीच एक म्हणजे कॉर्नस्टार्च. कॉर्नस्टार्चचा वापर करून तुम्ही किचनचा चिकटपणा काढून टाकू शकता. तसंच घरातील इतर कामंही सोपी होतील. (How Cornstarch Helps Remove Grease Dirt And Odor from Your Home And Clothes)

कॉर्नस्टार्चचा वापर करून घरातील कोणकोणती कामं करता येतात? (Uses Of Cornstarch)

1) खिडक्यांच्या काचा चमकवण्यासाठी

खिडक्यांच्या काचांवरील डाग लवकर जात नाहीत. अशा वेळी पाण्यात थोडा कॉर्न स्टार्च मिसळून त्या द्रावणाने काचा पुसा. यामुळे काचांवरील चिकटपणा दूर होतो आणि काचा नव्यासारख्या चमकू लागतात.

2) कपड्यांवरील तेलाचे डाग काढण्यासाठी

जेवताना कपड्यांवर तेल किंवा तुपाचे डाग पडले, तर त्यावर लगेच थोडे कॉर्न स्टार्च टाका. साधारण १५-२० मिनिटे ते तसेच राहू द्या. कॉर्न स्टार्च तेल शोषून घेते. त्यानंतर ब्रशने झटकून कपडे धुवा, डाग गायब होईल.

3) चांदीची भांडी आणि दागिने पॉलिश करणे

चांदीची भांडी काळी पडली असतील, तर कॉर्न स्टार्च आणि पाण्याचा घट्ट लेप तयार करा. हा लेप भांड्यांवर लावून सुकू द्या. नंतर मऊ कापडाने पुसून टाका. चांदी पूर्वीसारखी चकाकू लागेल.

4) चामड्याच्या वस्तूंची देखभाल

तुमची लेदर बॅग किंवा सोफ्यावर तेलकट डाग पडले असतील, तर त्यावर कॉर्न स्टार्च रात्रभर टाकून ठेवा. सकाळी ओल्या कापडाने पुसून घ्या. चामड्याला इजा न होता डाग निघून जातील.

5) पुस्तकांचा कुबट वास घालवण्यासाठी

जुन्या पुस्तकांना एक विशिष्ट प्रकारचा कुबट वास येतो. अशा पुस्तकांच्या पानांमध्ये थोडे कॉर्न स्टार्च शिंपडा. हे ओलावा शोषून घेते आणि पुस्तकांचा वास कमी करण्यास मदत करते.

6) लाकडी फर्निचरवरील पाण्याचे डाग

फर्निचरवर पाण्याचे पेले ठेवल्यामुळे पांढऱ्या रंगाचे गोल डाग पडतात. त्यावर थोडे कॉर्न स्टार्च टाकून हलक्या हाताने घासा, डाग पुसले जातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Cornstarch: 6 surprising uses to clean your home effectively.

Web Summary : Cornstarch isn't just for cooking! It removes window stains, grease from clothes, polishes silver, cleans leather, eliminates book odor and removes watermarks from wooden furniture, making your home sparkling clean.
टॅग्स :किचन टिप्सस्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजन