lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > रात्री घरात बारीक झुरळ फिरतात? ४ उपाय, १ मिनिटात गायब होतील झुरळं, किचन राहील स्वच्छ

रात्री घरात बारीक झुरळ फिरतात? ४ उपाय, १ मिनिटात गायब होतील झुरळं, किचन राहील स्वच्छ

Home Remedies To Get Rid Of Cockroaches Permanently : झुरळं नष्ट करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.  ज्यामुळे झुरळं पळून जाण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 01:38 PM2024-04-26T13:38:54+5:302024-04-26T15:17:44+5:30

Home Remedies To Get Rid Of Cockroaches Permanently : झुरळं नष्ट करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.  ज्यामुळे झुरळं पळून जाण्यास मदत होईल.

Home Remedies To Get Rid Of Cockroaches Permanently Home To Remove Cockroaches From House | रात्री घरात बारीक झुरळ फिरतात? ४ उपाय, १ मिनिटात गायब होतील झुरळं, किचन राहील स्वच्छ

रात्री घरात बारीक झुरळ फिरतात? ४ उपाय, १ मिनिटात गायब होतील झुरळं, किचन राहील स्वच्छ

कधी किचन स्लॅब, कधी कॅबिनेट्स तर कधी बाथरूमध्ये पलंगाच्या किनारी झुरळं भरपूर दिसतात. तर कधी सिंकच्या घाणेरड्या भांड्यांवर झुरळं फिरताना दिसतात. (How To Get Rid Of Cockroaches) अशी कोणतीही जागा नाही की तिथे झुरळं दिसत नाहीत. (Home Hacks) रात्रीच्यावेळी घरात खरकटं पडलं असेल किंवा अन्नाचे कण असतील, उष्टी भांडी असतील तर झुरळांचा वावर वाढतो. झुरळं नष्ट करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.  ज्यामुळे झुरळं पळून जाण्यास मदत होईल. (Home Remedies To Get Rid Of Cockroaches Permanently)

झुरळांना पळवण्याचे घरगुती उपाय

झुरळांना दूर पळवण्यासाठी गरम पाणी आणि व्हाईट व्हिनेगरचे पाणी फायदेशीर ठरेल. हे द्रावण बनवण्यासाठी सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्या. त्यात तीन तृतियांश व्हाईट व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण किचनचे स्लॅब्सच्या ठिकाणी लावा. ज्यामुळे कॉकरॉच मरून  जाण्यास मदत होते. 

बेकींग सोडा आणि गरम पाणी

झुरळे दूर करण्यासाठी हा उपायही तुम्हाला करता येईल. एक लिटर गरम पाण्यात एक लिंबाचा रस आणि 2 चमचे बेकिंग सोडा घालून सिंकमध्ये ओता. सिंकमध्ये लपलेली सर्व झुरळे वेदनेने मरतील. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून झुरळांवरही फवारता येते.

काकडीचा रस

काकडीच्या रसाने झुरळांना दूर पळवण्यास मदत होते.  घरात ज्या ठिकाणी जास्त झुरळं दिसून येतात तिथे काकडी ठेवा. काकडीच्या रसाने झुरळांपासून आराम मिळवण्यास मदत होईल. हा रस पाण्यात मिसळून तुम्ही झुरळांवरही शिंपडू शकता.

दालचिनी

दालचिनी झुरळांना दूर पळवण्यासाठी फायदेशीर ठरते. दालिचीनची पावडर किचन काऊंटरवर घाला आणि नंतर कॉकरॉच ज्या ठिकाणी असतात तिथे फवारा ज्यामुळे  झुरळं दूर होण्यास मदत होईल.  घराच्या कोपऱ्यांवरही तुम्ही ही पावडर घालू शकता.

तमालपत्र

तमालपत्राच्या तीव्र वासाने झुरळं दूर पळवण्यास मदत होते. तेजपत्ता पाण्यात घालून उकळवून घ्या त्यानंतर तेजपत्त्याचे पाणी पाण्यात घालून झुरळांवर शिंपडा यामुळे  झुरळं दूर होण्यास मदत होईल. याशिवाय तेजपत्त्याच्या सुंगधाने घरातील इतर किटकही दूर राहतील.

Web Title: Home Remedies To Get Rid Of Cockroaches Permanently Home To Remove Cockroaches From House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.