Join us

साडीच्या पदराला तर सेप्टीपिन लावतोच, पण ‘या’ ५ कामांसाठी तुम्ही सेप्टीपिन कधी वापरली का? नसेल तर पाहा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:27 IST

प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये, बॅगमध्ये एक दोन सेफ्टी पिना असतातच, पण त्याचा वापर अनेक कारणांसाठी होऊ शकतो, कसा ते पहा. 

सेफ्टी पिन या नावातच सगळे काही आले. सेफ्टी अर्थात सुरक्षेसाठी वापरली जाणारी ही वस्तू आपण पिन अप करण्यापुरती वापरतो. पण अडीअडचणीला तिला वापर इतक्या वेगवेगळ्याप्रकारेही केला जाऊ शकतो, हे वाचून थक्क व्हाल!

एक लहान सेफ्टी पिन खूप उपयुक्त ठरते. दैनंदिन कामात ती अतिशय उपयुक्त ठरू शकते. मात्र आपण कधी त्यादृष्टीने विचारच केला नसेल. जाणून घेऊया तिचे उपयोग आणि वापरण्याची योग्य पद्धत. 

स्वेटरची उसवलेली वीण बांधून ठेवण्यासाठी 

स्वेटर तसेच शालीचा एक धागा जरी सुटला तर पूर्ण कापड एक एक करत उसवू लागते. अशावेळी सेफ्टीपिनने एक धागा अलगद वर काढून सेफ्टीपिनने जोडला तर पुढची वीण उसवण्यापासून थांबते. 

किचेन म्हणून वापर 

प्रवासात असताना किचेन तुटली किंवा बॅगची चैन तुटली तर अशावेळी तात्पुरती सोय म्हणून सेफ्टीपिनचा वापर करू शकता. त्यामुळे चाव्या हरवणार नाहीत आणि चैन उतरली असेल तर सेफ्टीपिन जोडल्यामुळे बॅग उघडी राहणार नाही. 

कपडे हँगरवर स्थिरावण्यासाठी 

अनेकदा सिल्कचे कपडे हँगरवर अडकवून निसटतात, ते नीट राहावेत यासाठी ते सेफ्टीपिनने जोडून ठेवता येतात. तसेच बाहेर वाळत टाकलेले कपडे वाऱ्याने उडून जाऊ नये म्हणून सेफ्टीपिन वापरता येते. 

वॉशिंगमशीन मध्येही वापर 

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला घालताना सगळ्या कपड्यांमध्ये मोजे, हातरुमाल यांसारखे छोटे कपडे गुंडाळले जातात. हरवतात, कुठे तरी अडकून राहतात. यासाठी ते धुवायला टाकताना सेफ्टीपिनने जोडून टाका. 

प्राथमिक उपचारातही उपयोगी 

जखम झाली असता त्यावर औषध लावून पट्टी बांधली जाते किंवा पाय मुरगळ्यावर पट्टी गुंडाळली जाते तेव्हा ती घट्ट बांधलेली राहावी म्हणून सेफ्टीपिनने जोडून ठेवता येते. म्हणून प्राथमिक उपचारात तीदेखील ठेवली जाते. 

कपडे फिटिंगसाठी वापर 

एखादा ड्रेस, ब्लाउज सैल झाले असेल आणि टाका घालण्याइतका वेळ नसेल तर अशावेळी सेफ्टीपिनने तात्पुरते फिटिंग करून घेता येते. ती सावधपणे लावली असता टोचण्याची भीती राहत नाही आणि कपडे गबाळे दिसत नाहीत.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनकिचन टिप्स