Join us  

पाणीपुरीचा किती पचका कराल, डोकेबाजने बनवली मॅगीवाली पाणीपुरी.. पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 3:09 PM

Social viral: मॅगी आणि पाणीपुरी (maggiwale gol gappe) या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी योग्य आहेत, मग का त्यांना एकत्र करून त्यांच्या चवीचा असा पचका करता, असं म्हणत पाणीपुरी लव्हर्स (panipuri lovers) आणि मॅगी लव्हर्स (maggi lovers) त्यांचा राग व्यक्त करत आहेत.

ठळक मुद्देअसा अतरंगी प्रयोग कोणी कसा काय करू शकतो, असं वाटत असेल तर हा सोबतचा व्हिडिओ एकदा नक्की बघा... 

मॅगी आणि पाणीपुरी या दोन्ही पदार्थांचे चाहते अफाट आहेत.. प्रत्येक घरात मॅगी आणि पाणीपुरी मनापासून आवडते असा एक तरी खवय्या सापडतोच.. काही यम्मी, टेस्टी खावं वाटत असेल, चवीमध्ये बदल पाहिजे असेल तर सगळ्यात स्वस्त आणि मस्त पर्याय जो काही असेल त्यात मॅगी आणि पाणीपुरी हे दोन्ही पदार्थ येतात. नेमका याच दोन पदार्थांसोबत (Weird food combination) एका व्यक्तीने भयानक खेळ केला असून तो चक्क मॅगीमध्ये पाणीपुरी टाकून विकतो आहे...

 

अरेरे... बघा ना एखाद्याला कल्पनाही करवणार नाही, असा हा पदार्थ.. Abhijit Iyer-Mitra@Iyervval यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे... ''Extremely disturbing & distressing video. Viewer caution advised! (Maggi PaniPuri)'' अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. त्यावरूनच तुम्ही विचार करू शकता, की हा पदार्थ नेमका कसा असेल. असा अतरंगी प्रयोग कोणी कसा काय करू शकतो, असं वाटत असेल तर हा सोबतचा व्हिडिओ एकदा नक्की बघा...

 आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले..

 

मॅगी पाणीपुरी बनविण्यासाठी त्या विक्रेत्याने सगळ्यात आधी एक पाणीपुरीची पुरी घेतली. त्याला मधोमध छेद दिला आणि त्या पुरीत मॅगी भरली. मॅगी भरल्यानंतर त्यावर आणखी पुदिन्याचे तिखट पाणी टाकले आणि अशी ही मॅगी पाणीपुरी त्याने समाेरच्या व्यक्तीला खायला दिली..

आईस्क्रीमवर कोथिंबीर चटणी... सांगा, असं आईस्क्रीम कुणी खातं का? पाहा कसं दिसतंय..

आता हे असे मॅगीवाले गोलगप्पे खाऊन त्या खवय्याला काय वाटले, हे तर माहिती नाही, पण या व्हिडिओला ज्या काही कमेंट आल्या आहेत, त्यावरून तर नक्कीच हा प्रयोग नेटकरींना अजिबातच आवडलेला नाही. मॅगी आणि पाणीपुरी या दोन्ही अतिशय चवदार पदार्थांचा हा घोर अपमान आहे, असे नेटकरींचे म्हणणे आहे. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मॅगी