lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > पाडव्याला घरीच ५ मिनिटात करा आंब्याच्या पानांचं तोरण; महागडं तोरण विकत घ्यावं लागणार नाही

पाडव्याला घरीच ५ मिनिटात करा आंब्याच्या पानांचं तोरण; महागडं तोरण विकत घ्यावं लागणार नाही

Gudhi Padwa 2023 : कमीत कमी खर्चात घरीच तोरण बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:25 AM2023-03-22T11:25:36+5:302023-03-22T12:06:20+5:30

Gudhi Padwa 2023 : कमीत कमी खर्चात घरीच तोरण बनवू शकता.

Gudhi Padwa 2023 : Gudi-Padwa Special Easy mango Leaf Toran Ideas | पाडव्याला घरीच ५ मिनिटात करा आंब्याच्या पानांचं तोरण; महागडं तोरण विकत घ्यावं लागणार नाही

पाडव्याला घरीच ५ मिनिटात करा आंब्याच्या पानांचं तोरण; महागडं तोरण विकत घ्यावं लागणार नाही

गुढीपाडव्याला (Gudhi Padwa) सर्वांच्याच घरी तोरणं लावली जातात. पण बाजारात गुढीपाडव्याला किंवा दसऱ्याला तोरणं अतिशय महाग विकली जातात. (Gudi-Padwa Special Easy mango Leaf Toran Ideas) जर तुमच्या घरच्या आजूबाजूला आंब्याचं झाड असेल किंवा बाजारातून आंब्याची पानं विकत आणली तर तुम्ही कमीत कमी खर्चात घरीच तोरण बनवू शकता. अगदी ५ ते १० मिनिटंत हे तोरण बनून तयार होईल. (How to make toran for gudhipadwa)

जेव्हाही घरात कोणतेही शुभ कार्य होते तेव्हा पानं दाराच्या वर ठेवण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की शुभ कार्याच्या वेळी घराच्या दारावर ही पाने लावल्याने ते काम सफळ होते. यामुळे घरात सकारात्मक उर्जा टिकून राहते. आनंद, समृद्धी शांती  येते असं मानलं जातं.  लोक शुभ कार्यासाठीच या पानांचा वापर करतात पण तुम्ही इतर कोणत्याही दिवशी ही पानं दारावर लावू शकता.  याशिवाय आंब्याच्या पानात अनेक औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. 

सगळ्यात आधी आंब्याची पानं स्वच्छ धुवून सुकवून घ्या. नंतर पानं स्वच्छ कापडानं पुसा. पण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरी दोऱ्याच्या साहाय्य्यानं या पानांचं तोरण बनवा.  यात तुम्ही पिवळी, नारंगी रंगाची झेंडूची फुलं वापरू शकता. किंवा घरात जी फुलं उपलब्ध असतील त्या फुलांच्या साहाय्यानं तोरण बनवून  घ्या. 

Web Title: Gudhi Padwa 2023 : Gudi-Padwa Special Easy mango Leaf Toran Ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.