Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > नवऱ्याच्या मित्रांनी नवरीकडून करारच सही करून घेतला; यावरच्या अटी वाचून जोरजोरात हसाल

नवऱ्याच्या मित्रांनी नवरीकडून करारच सही करून घेतला; यावरच्या अटी वाचून जोरजोरात हसाल

Groom friends sign such an agreement from bride : वधू-वर स्टेजवर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दरम्यान वराचे मित्र त्याच्याभोवती उभे असलेले दिसतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:19 IST2022-06-06T19:40:23+5:302022-06-07T13:19:15+5:30

Groom friends sign such an agreement from bride : वधू-वर स्टेजवर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दरम्यान वराचे मित्र त्याच्याभोवती उभे असलेले दिसतात.

Groom friends sign such an agreement from bride it was written will have to wear saree everyday | नवऱ्याच्या मित्रांनी नवरीकडून करारच सही करून घेतला; यावरच्या अटी वाचून जोरजोरात हसाल

नवऱ्याच्या मित्रांनी नवरीकडून करारच सही करून घेतला; यावरच्या अटी वाचून जोरजोरात हसाल

भारतात लग्नसराईचं वातावरण सुरू आहे. यादरम्यान लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये काही व्हिडिओ लोकांना हसवतात तर काही व्हिडिओ भावूक करतात. अनेक व्हिडिओ लोकांच्या हृदयाला स्पर्श करतात. लग्नाच्या व्हिडीओमध्ये वधू आणि वराशी संबंधित व्हिडिओ युजर्सना खूप आवडतात. (Groom friends sign such an agreement from bride it was written will have to wear saree everyday)

आजकाल वधू-वराचे मित्र-मैत्रिणी खूप धमाल करत आहे. या व्हिडिओमध्ये वराचे मित्र वधूला करारावर स्वाक्षरी करायला सांगतात. हा करार पाहून सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु त्यासोबतच तुम्हाला आनंदही मिळेल. वास्तविक, वराच्या मित्रांनी वधूसोबत केलेले करार पाहिला तर त्यात अतिशय विचित्र शब्द लिहिले आहेत. उदाहरणार्थ, लग्नानंतर वधूला रोज साडी घालावी लागेल.

 भर रस्त्यात बैलाच्या समोर रील बनवणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

वधू-वर स्टेजवर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दरम्यान वराचे मित्र त्याच्याभोवती उभे असलेले दिसतात. त्याच्या हातात एक मोठा साईन बोर्ड दिसतो. वास्तविक हा करारनामा फलक आहे, ज्यावर वधूसाठी अनेक अटी लिहिल्या आहेत. यामध्ये पहिल्या मुद्यावर 'वधू घरातील कामांसाठी कधीही नकार देऊ शकत नाही' असे लिहिले आहे. दुसऱ्या मुद्द्यावर 'साडी रोज नेसावी लागेल' असे लिहिले आहे. 

वय म्हणजे फक्त एक आकडा आहे! आजींची दोरी उड्या मारण्याची पद्धत पाहून तरुणही लाजतील

यानंतर पुढच्या मुद्यावर 'रोज एक तास पूजा करावी लागेल' असे लिहिले आहे. चौथ्या मुद्द्यावर 'तुम्ही कमी बोलले पाहिजे' असे लिहिले आहे आणि शेवटची अट आहे 'किमान फोटो काढावी लागतील'. कराराच्या शेवटी 'वधूला सर्व काही स्वीकारावे लागेल, अन्यथा तिला वराच्या घरात प्रवेश नाही' असे लिहिले आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वधूने हा करार स्वीकारला आणि स्वाक्षरी दिली. सिमरनबलारजेन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

Web Title: Groom friends sign such an agreement from bride it was written will have to wear saree everyday