Join us

अजबच! 'या' तरुणीला पाण्यासह ४० गोष्टींची ॲलर्जी, पाण्याची ॲलर्जी असेल तर जगते कशी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:17 IST

Rare Disease : आश्चर्याची बाब म्हणजे इतका दुर्मीळ आजार असूनही ही तरूणी आनंदी राहते. मात्र, तिला काहीही खाण्याआधी, कुठे जाण्याआधी किंवा काहीही करण्याआधी खूप काळजी घ्यावी लागते. 

Rare Disease : वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी असते. कुणाला धुळीची ॲलर्जी असेत तर कुणाला एखाद्या पदार्थाची ॲलर्जी  असते. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका तरूणीला धूळ-पाण्यासह ४० पेक्षा अधिक गोष्टींची ॲलर्जी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतका दुर्मीळ आजार असूनही ही तरूणी आनंदी राहते. मात्र, तिला काहीही खाण्याआधी, कुठे जाण्याआधी किंवा काहीही करण्याआधी खूप काळजी घ्यावी लागते. 

१९ वर्षीय क्लो रामसे हिला जन्मापासूनच अनेक खाद्य पदार्थांची ॲलर्जी होती. केळी आणि बटाटे खाल्लानंतर तिला एनाफायलॅक्टिक शॉक येत होता. सुदैवानं बालपणी करण्यात आलेल्या उपचारानंतर तिला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येत नाही. सध्या क्लोकडे ४० गोष्टींची एक यादी आहे. ज्यामुळे तिला तोंडात आणि घशात गंभीर सूज येऊ शकते किंवा तिच्या त्वचेवर गंभीर प्रभाव पडू शकतो.

फळांची ॲलर्जी

फळांमध्ये तिला केळी, कीवी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी, पेर आणि द्राक्ष्याची अ‍ॅलर्जी आहे. क्लो २०२३ मध्ये 'पराग खाद्य सिंड्रोम' नं पीडित आढळून आली. पॉलिनेशननं तयार होणारं फळ किंवा भाजीनं तिला ॲलर्जी होते. यात मिठाई, फळं आणि अत्तराचाही समावेश आहे.

पाण्याचीही ॲलर्जी

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण क्लो ला पाण्यापासून ॲलर्जी आहे. या ॲलर्जीला एक्वाजेनिक अर्टिकेरिया नावानं ओळखलं जातं. औषधाविना आंघोळ केल्यास तिच्या त्वचेवर फोड येतात आणि पावसात भिजल्यास तिला चाकूनं त्वचा फाडण्याची इच्छा होते. क्लो म्हणाली की, ती सहा महिन्यांची होती तेव्हा ॲलर्जीबाबत समजलं आणि माझ्या आईनं मला दूध पाजणं बंद केलं. जर मी केळी किंवा बटाटे खाल्ले तर त्वचे निळी पडत पडत होती आणि बेशुद्ध पडत होती. सुदैवानं मला होणारे रिअॅक्शन आता तेवढे वाईट नाहीत.

आयुष्यभर घ्यावं लागेल इंजेक्शन

क्लो म्हणाली की, एक दिवस अचानक पाण्याची ॲलर्जी असल्याचं समजलं. मला वाटलं की, मी एखादं बॉडी वॉश वापरलं आहे. ज्यामुळे मला ॲलर्जी आहे. जी आणखी गंभीर होत गेली. जेव्हा कधी मी हात धुवत होती तेव्हा हातावर पुरळ येत होती आणि असं वाटत होतं जणू माझ्या त्वचेवर मुंग्या चालत आहेत. आता मला ॲलर्जीवर उपचार करण्यासाठी जीवनभर इंजेक्शन घ्यावं लागेल.

ऑक्टोबर २०२२ मध्ये जेव्हा तिची त्वचा पाण्याच्या संपर्कात आली तेव्हा त्वचेवर पुरळ येत होती. याचा प्रभाव कधी कधी इतका गंभीर होत होता की, एखाद्या गोष्टीवर फोकस करण्यास तिला अडचण येत होती. सुदैवानं पाणी प्यायल्यावर तिला काही समस्या होत नाही.

क्लो हिला स्प्रेडशीटवर ट्रॅफिक लाइट कलर कोडेड सिस्टीमचा वापर करून रेकॉर्ड ठेवावा लागतो की, तिला कोणत्या पदार्थांनी ॲलर्जी आहे आणि किती गंभीर आहे. ती म्हणाली की, आयुष्यभर कुणालाही इंजेक्शन दिलं गेलं नाही. मी त्या तीन टक्के लोकांपैकी आहे जी पूर्णपणे बरी होऊ शकली नाही. मला इतक्या गोष्टींची एलर्जी आहे की, माझे आई-वडील गंमतीत म्हणतात की, आता तुला कशाची ॲलर्जी होणार, ऑक्सीजन?.

टॅग्स :आरोग्यजरा हटके