Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > प्यार हो तो ऐसा! गर्लफ्रेंडने दिलं इतकं खास गिफ्ट, तरुणाला अनावर झाले अश्रू...

प्यार हो तो ऐसा! गर्लफ्रेंडने दिलं इतकं खास गिफ्ट, तरुणाला अनावर झाले अश्रू...

Girl Surprises Her Boyfriend with Special Gift After His Dog Passes Away Viral Video : त्याच्या भावना कॅमेरात कैद झाल्या असून हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 11:52 IST2022-08-09T11:48:59+5:302022-08-09T11:52:05+5:30

Girl Surprises Her Boyfriend with Special Gift After His Dog Passes Away Viral Video : त्याच्या भावना कॅमेरात कैद झाल्या असून हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत

Girl Surprises Her Boyfriend with Special Gift After His Dog Passes Away Viral Video : Love is like that! The girlfriend gave such a special gift, the young man burst into tears... | प्यार हो तो ऐसा! गर्लफ्रेंडने दिलं इतकं खास गिफ्ट, तरुणाला अनावर झाले अश्रू...

प्यार हो तो ऐसा! गर्लफ्रेंडने दिलं इतकं खास गिफ्ट, तरुणाला अनावर झाले अश्रू...

Highlightsनेटीझन्सनी या व्हिडिओवर बऱ्याच कमेंटस केल्या असून एकाने गिफ्ट खूप महागच असले पाहिजेत असे नाही पण त्यामध्ये भावना असायला हवी असे म्हटले आहे.गर्लफ्रेंड त्याच्यासमोर बसली असून ती त्याचे हावभाव कॅमेरात टिपत आहे.

प्रेम ही अशी भावना आहे जी तुम्हाला मुळापासून बदलवते. प्रेमात पडलो की आपण समोरच्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी शब्द मदतीला येतात तर कधी एकमेकांना प्रेमाने दिलेल्या वस्तू. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड तर काही ना काही कारणाने एकमेकांना गुलाब, चॉकलेट, त्यांच्या आवडीच्या वस्तू असं काही ना काही गिफ्ट देत असतात. अशाप्रकारे प्रेम व्यक्त करायला फक्त व्हॅलेंटाइन डेचं निमित्त असावं लागतं असं काही नाही. तर एखाद्या आनंदाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगीही आपण आपल्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीला काही ना काही गिफ्ट देतो. तसंच एका मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला एक खास गिफ्ट दिलं. तिने दिलेलं गिफ्ट पाहून त्याला इतकं भरुन आलं की अश्रू अनावर झाले (Girl Surprises Her Boyfriend with Special Gift After His Dog Passes Away Viral Video). 

(Image : Google)
(Image : Google)

त्याचं झालं असं की या मुलाच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाले. आपल्या  कुटुंबियांप्रमाणे एक असणारा प्राणी आपल्यासाठी किती खास असतो हे वेगळं कोणी सांगायला नको. आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावर आपल्याला जेवढं दु:ख होतं त्याचप्रमाणे हा प्राणी आपल्याला सोडून गेला की आपल्याला दु:ख होतं. या मुलाच्या वाट्यालाही असंच दु:ख आलं होतं. त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला आपल्या कुत्र्याची आठवण कायम सोबत राहावी यासाठी एक खास गिफ्ट दिलं. ते पाहून या तरुणाला इतकं भरुन आलं की त्याला अश्रू अनावर झाले. त्याच्या भावना कॅमेरात कैद झाल्या असून हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी इतकं स्पेशल गिफ्ट दिल्याबद्दल या गर्लफ्रेंडचे सोशल मीडियात कौतुक होत आहे.

'मॅजिकली न्यूज' या  इंन्स्टाग्राम अकाऊंटवर हाा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत ३ लाखहून अधिक जणांनी तो पाहिला आहे. यामध्ये एक तरुण एक बॉक्स उघडताना दिसत आहे. त्याची गर्लफ्रेंड त्याच्यासमोर बसली असून ती त्याचे हावभाव कॅमेरात टिपत आहे. आपल्या लाडक्या कुत्र्याचा ३ डी होलोग्राफीक फोटो पाहून हा मुलगा भावूक होतो आणि त्याला रडू कोसळते. काचेमध्ये असलेले हे शोपीस अतिशय सुंदर असून कुत्र्याची आठवण सोबत राहावी या हेतुने या गर्लफ्रेंडने ते दिले असावे. याशिवाय दुसरे चांगले काहीच गिफ्ट असू शकत नाही अशीच भावना कदाचित या मुलाची झाली असावी. नेटीझन्सनी या व्हिडिओवर बऱ्याच कमेंटस केल्या असून एकाने गिफ्ट खूप महागच असले पाहिजेत असे नाही पण त्यामध्ये भावना असायला हवी असे म्हटले आहे. 

Web Title: Girl Surprises Her Boyfriend with Special Gift After His Dog Passes Away Viral Video : Love is like that! The girlfriend gave such a special gift, the young man burst into tears...