भाषेचे गणित जेवढे वाटते तेवढे सोपे नाही. मुल जन्माला आल्यानंतर ओठांच्या हालचाली पाहून आणि आई-बाबांचे उच्चार ऐकून ते मेंदूत फिट करत असते. (GenZ's words 'Delulu' and 'Tradeswife' are very confusing! Cambridge has listed them in the dictionary, but what do they mean?)भाषेचे संस्कार केले जातात असे भारतात म्हणण्याची पद्धत आहे. हळूहळू या आकलन केलेल्या भाषेवर सामाजिक बाबींचा प्रभाव पडायला लागतो. खरे तर व्यक्ति परत्वे भाषेचा वापर बदलतो. त्याची दखल भाषातज्ज्ञांमार्फत घेतली जाते. नव्या पिढीतील मुलं संमिश्र भाषा बोलतात. त्यांच्या भाषेला जुन्या पिढीतील लोकं गढूळ किंवा अशुद्ध भाषा म्हणून संबोधतात. भाषाशास्त्र सांगते कोणतीही भाषा अशुद्ध नसते. भाषा वेळेनुसार आणि काळानुसार बदलत जाते. नवीन शब्द सातत्याने वापरले जातात. वापरणारा वर्ग मोठा असतो. त्यामुळे ते शब्द भाषेत रुजू होतात.
जसे पूर्वी मोबाइल, फोन, टेबल, पेन, रोड असे शब्द सगळ्या भाषिकांनी आत्मसात केले तसेच काही नवीन संकल्पना आणि नवे शब्द जेनझी आणि जेन अल्फा पिढी मार्फत वापरले जातात. त्या शब्दांचा अर्थ आधीच्या दोन्ही पिढ्यांना समजून घेणे फार कठीण जाते. केंब्रिज डिक्शनरीने असेच काही तरुणांमार्फत वापरले जाणारे शब्द यादीत समाविष्ट केले आणि त्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मिडिया, विविध ऑनलाईन माध्यमांमुळे भाषेचे रुप फारच वेगाने बदलत आहे. एखादा शब्द चुकून उच्चारला गेला तरी तो ट्रेंड होऊन जातो. जसे की आजकाल कॅट शब्द न वापरता कार वापरला जातो. कारण एवढेच की कॅट टाईप करताना गूगल ऑटोकरेक्टला कार असा शब्द दिसतो. पण आता जगभरातले मांजर प्रेमी त्याच्या मांजरीला कार म्हणूनच संबोधतात.
केंब्रिजने डेलुलू (delusional- स्वतःच्याच विश्वास जगणारे-रमणारे त्यालाच सत्य मानणारे ), स्किबिडी (cool or bad- मज्जा म्हणून वापरला जाणारा शब्द चांगल्या वाईट दोन्ही अर्थी वाररतात), ट्रॅडवाईफ (housewife - घरात राहून एक गृहीणी म्हणून जगणारी स्त्री त्याबद्दल अजिबात खंत नसणारी आनंदी गृहीणी) असे काही तरुणांमार्फत वापरले जाणारे शब्द डिक्शनरीत समाविष्ट करुन घेतले. काही वर्षांपूर्वी YOLO (you only live life once) हा शब्द ऑक्सफर्डने तर इतरही काही शब्द जगभरात वापरल्या जाणाऱ्या डिक्शनरीत सामील केले गेले. केंब्रिज असो किंवा ऑक्सफर्ड बदलत्या पिढीनुसार शब्दांची यादी वाढवणे त्यांचे काम आहे. मात्र वाचकांची चिंताही तशी योग्यच कारण ऑनलाइन कनटेंट पाहून वापरले जाणारे हे शब्द काही काळासाठीच वापरले जातात. नंतर ते शब्दांची ज्यांनी निर्मिती केली ते ही विसरुन जातात. त्यामुळे असे शब्द भाषेत रुजवण्याची गरज आहे का असे प्रश्न सोशल मिडियावर लोकांनी विचारले.