lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Gehraiyaan : दीपिकाची बहिण अनिशा 'गहराइयां' चित्रपटात झळकली; फॅन्सनी ओळखलं, तुम्ही पाहिलं की नाही

Gehraiyaan : दीपिकाची बहिण अनिशा 'गहराइयां' चित्रपटात झळकली; फॅन्सनी ओळखलं, तुम्ही पाहिलं की नाही

Gehraiyaan : दीपिका पदुकोणच्या चाहत्यांनी दावा केला आहे की, अनिशादेखील या चित्रपटात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 07:10 PM2022-02-14T19:10:24+5:302022-02-14T23:42:15+5:30

Gehraiyaan : दीपिका पदुकोणच्या चाहत्यांनी दावा केला आहे की, अनिशादेखील या चित्रपटात आहे. 

Gehraiyaan : Deepika padukone fan spots her sister anisha padukone in gehraiyaan did you notice | Gehraiyaan : दीपिकाची बहिण अनिशा 'गहराइयां' चित्रपटात झळकली; फॅन्सनी ओळखलं, तुम्ही पाहिलं की नाही

Gehraiyaan : दीपिकाची बहिण अनिशा 'गहराइयां' चित्रपटात झळकली; फॅन्सनी ओळखलं, तुम्ही पाहिलं की नाही

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) 'गहराईयां' (Gehraiyaan) हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील दीपिका आणि बाकीच्या स्टारकास्टच्या कामाचे खूप कौतुक केले जात आहे, परंतु दीपिकाची बहीण अनिशा देखील चित्रपटातील एका दृश्यात दिसल्याचे तुमच्या लक्षात आले आहे. दीपिका पदुकोणच्या चाहत्यांनी दावा केला आहे की, अनिशाही या चित्रपटात आहे. 

दीपिका पदुकोणने या चित्रपटात अनिशाची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या एका दृश्यात दीपिकाचे  बालपणीचे फोटो दाखवले आहेत, ज्यामध्ये अनिशा कधी तिच्या आईसोबत तर कधी वडिलांसोबत दिसते. पण एका चित्रात अलिशा तिची चुलत बहीण टिया (अनन्या पांडे) सोबत दिसत आहे, ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. चाहत्यांनी सांगितले की, दीपिकाच्या बालपणीच्या फोटोमध्ये तिच्यासोबत दुसरे कोणी नसून तिची बहीण अनिशा आहे.

फॅन्सची शेअर केला स्क्रिनशॉट

'गहराइयां' चित्रपटाच्या या दृश्याचा स्क्रीनशॉट अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्क्रीनशॉट पोस्ट करत एका चाहत्याने लिहिले की, 'गहराइयां'मध्ये दीपिका आणि अनिशाचे बालपणीचे फोटो दाखवले आहेत, मला ते खूप आवडले. एका यूजरने या पोस्टवर कमेंट केली की, ही कल्पना दिग्दर्शकाची आहे की दीपिकाची आहे, हे मला माहीत नाही, पण मला ही गोष्ट खूप आवडली.

लाईमटाईटपासून दूर असते दीपिकाची बहीण

विशेष म्हणजे दीपिका पदुकोणची बहीण अनिशाला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. तिला दीपिकासारखे अभिनयात करिअर करायचे नव्हते, म्हणून ती व्यावसायिक गोल्फर बनली. या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा आणि अनन्या पांडे यांनी 'गहराइयां' चित्रपटात काम केले आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित हा चित्रपट दोन जोडप्यांच्या गुंतागुंतीच्या नात्याच्या कथेवर आधारित आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडतोय.

Web Title: Gehraiyaan : Deepika padukone fan spots her sister anisha padukone in gehraiyaan did you notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.