lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > शेवटच्या क्षणी घाईघाईत भारी डेकोरेशन करायचंय? घ्या आयडिया, हवी फक्त १ ओढणी- करा आरास भारी 

शेवटच्या क्षणी घाईघाईत भारी डेकोरेशन करायचंय? घ्या आयडिया, हवी फक्त १ ओढणी- करा आरास भारी 

Ganapati Decoration Using 1 Dupatta: गणपतीच्या सजावटीसाठी खूप साहित्य उपलब्ध नसेल तर फक्त १ ओढणी वापरून कशी अगदी झटपट आकर्षक सजावट करायची ते पाहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 01:00 PM2023-09-18T13:00:48+5:302023-09-18T13:02:25+5:30

Ganapati Decoration Using 1 Dupatta: गणपतीच्या सजावटीसाठी खूप साहित्य उपलब्ध नसेल तर फक्त १ ओढणी वापरून कशी अगदी झटपट आकर्षक सजावट करायची ते पाहा....

Ganapati decoration using just 1 dupatta, How to do Ganapati decoration quickly? Decoration tips for Ganapati backdrop  | शेवटच्या क्षणी घाईघाईत भारी डेकोरेशन करायचंय? घ्या आयडिया, हवी फक्त १ ओढणी- करा आरास भारी 

शेवटच्या क्षणी घाईघाईत भारी डेकोरेशन करायचंय? घ्या आयडिया, हवी फक्त १ ओढणी- करा आरास भारी 

Highlightsफक्त १ ओढणी वापरून गणपतीसाठी अगदी झटपट आकर्षक बॅकड्रॉप कसा करायचा, ते पाहूया....

आता बऱ्याच जणांची गणपतीच्या सजावटीची तयारी होत आली आहे. पण तरीही कामाच्या गडबडीमुळे कोणाची तयारी राहून जाते. बाजारात जाऊन सजावटीचं खूप साहित्य आणणंही होत नाही. शिवाय काही जणांकडे गणपतीसाठी खूप मोठी आरास करायला, मोठं मखर करायला जागाही नसते. अशावेळी फक्त १ ओढणी वापरून गणपतीसाठी अगदी झटपट आकर्षक बॅकड्रॉप कसा करायचा, ते पाहूया (How to do ganapati decoration quickly?)... एक आकर्षक ओढणी आणि थोड्याफार फुलांच्या माळा किंवा लायटिंग असं केलं तरी तुमची सजावट खूप छान दिसेल. (Ganapati decoration using just 1 dupatta)

 

ओढणी वापरून गणपतीची सजावट कशी करायची?

१. भिंतीमध्ये दोन्ही बाजूंनी दोन हूक लावून घ्या. दोन्ही हूकमधलं अंतर ओढणीच्या रुंदीपेक्षा जास्त नसावं.

पुऱ्या लाटताना तुम्ही पुरीला तेल लावता की पीठ? बघा यातलं नेमकं काय योग्य आणि काय चुकीचं

त्याला दोरी बांधून घ्या आणि त्यावर वाळत घातल्याप्रमाणे ओढणी टाका. आता ओढणीचा वरचा पदर उजव्या दिशेला तर खालचा पदर डाव्या दिशेला ओढून घ्या. कमानीचा आकार येईल. कमानीच्या आकाराच्या खाली दोन्ही बाजुनी लेस बांधून घ्या. त्यावर लाईटिंग केली आणि फुलांची माळ सोडली की झाला बॅकड्रॉप तयार...

 

२. या दुसऱ्या प्रकारच्या सजावटीमध्ये भिंतीमध्ये एक हूक किंवा खिळा लावलेला असला तरी पुरेसा आहे.

गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट

ओढणी अगदी मधोमध त्या खिळ्यात अडकवून द्या. ओढणीची दोन्ही बाजूची टोके आता लांब करून पसरवून द्या. त्रिकोणासारखा आकार तयार होईल. ओढणीचा मधला काठ बरोबर मध्यभागी लावून जोडून घ्या. 

 

३. तिसऱ्या प्रकारच्या सजावटीमध्येही भिंतीतल्या एका खिळ्यात ओढणी अडकवून द्या.

गणेशोत्सव : फक्त ३०० रुपयांहूनही कमी किमतीत घ्या डेकोरेशनचं साहित्य, चमचमता मोदक- एलईडी उंदीर- पाहा पर्याय

आणि ओढणीचे दोन्ही टोक 'U' आकारात दोन्ही बाजूने वळवून घ्या. त्यावर फुलांच्या माळा सोडल्या की छान सजावट होऊन जाईल. 

 

Web Title: Ganapati decoration using just 1 dupatta, How to do Ganapati decoration quickly? Decoration tips for Ganapati backdrop 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.