घरात उंदीर शिरणे ही अनेक घरांतील समस्या आहे. हा प्राणी आकाराने छोटा असला तरी घरातील अन्न, कपडे, कागद आणि फर्निचरचे मोठे नुकसान करतो. उंदीर घरात येण्यामागे मुख्य कारण म्हणजे त्यांना अन्न, पाणी आणि सुरक्षित आश्रय हवा असतो. स्वयंपाकघरात उघडे ठेवलेले अन्न, न झाकलेले डबे, कचरा किंवा साठवलेले धान्य याकडे ते आकर्षित होतात. (Follow these simple tips to keep mice away from your house)थंड हवामानात उबदार जागा शोधण्यासाठी ते घरात येतात. घरातील फटी, पाइपजवळील छिद्रे किंवा दरवाजाखालचे छोटे मार्ग हे त्यांचे प्रवेशद्वार असतात. उंदीर घरात राहू लागले की ते अनेक आजारांचे वाहक ठरतात. त्यांची विष्ठा आणि मूत्रामुळे अन्न दूषित होते. त्यातून लॅपटोस्पायरोसिस, सॅल्मोनेला फूड पॉइझनिंग, अॅलर्जी आणि अस्थमाचा त्रास वाढू शकतो. उंदीरांवर असलेले परजीवी फार धोकादायक ठरतात. त्यामुळे घर स्वच्छ ठेवणे आणि उंदीरांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे.
उंदीर पळवून लावण्यासाठी काही सोपे, सुरक्षित आणि घरगुती उपाय करता येतात. सर्वप्रथम घरातली स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. अन्न उघडे ठेवू नका, कचरा दररोज फेकून द्या आणि सर्व अन्नपदार्थ बंद डब्यात ठेवा. घरातील भिंतींतील किंवा पाइपभोवती असलेली छिद्रे, फटी सिलिकॉन किंवा स्टील वूलने बंद करा. उंदीर फारच लहान छिद्रातूनही शिरु शकतो, त्यामुळे प्रत्येक कोपरा तपासा.
उंदीरांना काही वास फार त्रासदायक वाटतात. जसे की पुदिना, लवंग, दालचिनी यांचा वास उंदीरांना आवडत नाही. कापसाच्या बोळ्यांवर पुदिन्याचा रस टाकून उंदीर जिथे दिसतात त्या ठिकाणी ठेवा. दर काही दिवसांनी ते बदलत राहा. तसेच लवंग किंवा दालचिनीची छोटी पाकिटे एंट्री पॉइंटजवळ ठेवली तरी उंदीर दूर राहतात. काहीजण लाइव्ह ट्रॅप वापरतात, यात उंदीर जिवंत पकडले जातात आणि घरापासून दूर सोडले जातात. ही पद्धत सुरक्षित आणि मानवी आहे.
घराभोवती गवताचे किंवा कचऱ्याचे ढीग ठेवू नका, कारण अशा जागा उंदरांना आकर्षित करतात. पाळीव प्राण्यांचे अन्न रात्री उघडे ठेवू नका आणि घरातली वस्तू नियमितपणे हलवून धूळ साफ करा. स्वच्छता आणि सावधगिरी हेच उंदीरमुक्त घराचे गुपित आहे. थोडे नियमित प्रयत्न, नैसर्गिक उपाय आणि जागरुकता यामुळे उंदीर दूर राहतात आणि आपले घर सुरक्षित, स्वच्छ आणि निरोगी राहते.
Web Summary : Mice enter homes seeking food and shelter, causing damage and spreading disease. Keep food sealed, seal entry points, and use scents like mint or cinnamon. Live traps and maintaining cleanliness are effective solutions.
Web Summary : चूहे भोजन और आश्रय की तलाश में घरों में प्रवेश करते हैं, जिससे नुकसान होता है और बीमारियाँ फैलती हैं। भोजन को सील करें, प्रवेश बिंदुओं को सील करें, और पुदीना या दालचीनी जैसे सुगंधों का उपयोग करें। लाइव ट्रैप और सफाई बनाए रखना प्रभावी समाधान हैं।