पावसाळा काहींना प्रचंड आवडतो, तर काहींना चिखलामुळे घराबाहेरच पडावेसे वाटत नाही. पावसाळ्यात सगळीकडे फक्त चिखलच नसतो तर इतरही कचरा पसरलेला असतो. (Feet get itchy when they get wet in rainwater or mud, 4 remedies - Avoid the risk of infection)सगळीकडे पाणी भरते. पाणी भरले नाही तरी पावसाचे पाणी सगळीकडे थोडे तरी साठतेच. कितीही काही केले तरी पायाला थोडे पाणी लागतेच आणि पाय ओले होतातच. पायाला पावसाचे जमिनीवर साठलेले पाणी लागल्यावर पायाला त्याचा त्रास होतो. पावसाचे पाणी पायाला लागल्यावर लगेच काही जाणवत नाही मात्र थोड्याच वेळात पायाला खाज सुटायला लागते. कितीही खाजवले तरी समाधान मिळत नाही. पायाची त्वचा निघते आणि कधीतरी रक्तही येते. पावसाळ्यात पायाला पाणी लागणारच. त्याला काही इलाज नाही. घराबाहेर जावे लागतेच. पण काही सोपे उपाय आहेत ते केल्याने पायाला येणारी खाज लगेच बंद होईल.
१. सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने पाय धुवायचे साबण लावायचा. शक्यतो बाहेरुन आल्यावर आपण पाय फक्त पाण्याने धुतो. मात्र पावसाळ्यात पायाला साबण लावणे गरजेचे असते. नंतर मऊ पंच्याने पुसून घ्यायचे. पायाला कोणतेही तेल लावायचे. व्यवस्थित रगडून लावायचे.
२. मोजे घालणे टाळा. तसेच शूज घालू नका. पाय झाकलेला असेल तर पाणी लागणार नाही असे आपल्याला वाटते मात्र तसे होत नाही. उलट पाय जास्त उबतो आणि पायाला खाज जास्त येते. पावसाळी चपला घ्या. मोकळ्या असतात. त्याच वापरा. चपलेच्या पट्टीमुळेही पायाला खाज येते. त्यामुळे चपल चांगली निवडा. साधीच घ्यायची.
३. गरम पाण्यात पाय बुडवायचे. पायाला खाजणारी घाण साफ होते आणि पावसाच्या पाण्यामुळे पायावर फोड येत नाहीत. तसेच पायाला आराम मिळतो.
४. पाण्यातील विषाणू, बॅक्टेरिया यामुळेही खाज सुटते. अँण्टी फंगल पावडर मिळतात तसेच क्रिमही मिळतात. त्यांचा वापर करायचा. झोपताना पायाला लावा म्हणजे शांत झोप लागेल.
पायाला सतत खाज येऊन फोडे येतात. हे अगदी कॉमन आहे. मात्र ते फोड बरेच दिवस राहीले किंवा सतत खाजवले की फुटतात आणि त्यात पस तयार होतो. जास्तच वाढले तर फोड चिघळतात. चिघळे की मात्र त्रासदायक ठरु शकतात. जर फोड चिघळले तर मग डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.