lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > लग्न झाल्यानंतर 'अच्छी बहू' होण्यासाठी बघा हेमा मालिनीने ईशाला कोणते सल्ले दिले होते...

लग्न झाल्यानंतर 'अच्छी बहू' होण्यासाठी बघा हेमा मालिनीने ईशाला कोणते सल्ले दिले होते...

Esha Deol Open up About Her Married Life: हेमा मालिनीने दिलेल्या सल्ले ऐकून अभिनेत्री ईशा देओल ही चांगली सून तर झाली... पण तरीही तिचा हा चांगुलपणा तिचा संसार टिकवू शकला नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 05:02 PM2024-02-08T17:02:38+5:302024-02-08T17:04:09+5:30

Esha Deol Open up About Her Married Life: हेमा मालिनीने दिलेल्या सल्ले ऐकून अभिनेत्री ईशा देओल ही चांगली सून तर झाली... पण तरीही तिचा हा चांगुलपणा तिचा संसार टिकवू शकला नाही.

Esha Deol reveals about the advice given to her by her mother Hema Malini on her wedding | लग्न झाल्यानंतर 'अच्छी बहू' होण्यासाठी बघा हेमा मालिनीने ईशाला कोणते सल्ले दिले होते...

लग्न झाल्यानंतर 'अच्छी बहू' होण्यासाठी बघा हेमा मालिनीने ईशाला कोणते सल्ले दिले होते...

Highlightsकोणतीही सर्वसामान्य आई आपल्या लेकीला जो सल्ला देईल, तोच सल्ला हेमाजींनी दिला होता.

अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र यांची लेक म्हणजे अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol). ईशाचं लग्न १२ वर्षांपुर्वी भरत तख्तानीशी (Bharat Takhtani) झालं. त्यानंतर अनेक वर्षें त्यांचा संसार छान सुरू होता. पण मागील काही वर्षांपासून मात्र त्या दोघांचं एकमेकांशी पटत नाहीये. त्यामुळेच त्यांनी दोघांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि नुकताच त्या दोघांचा घटस्फोट झाला. यानिमित्ताने ईशाचे लग्न, तिचा संसार याविषयीचे अनेक किस्से समोर आले असून लग्न झाल्यानंतर हेमा मालिनी यांनी त्यांच्या लेकीला म्हणजेच ईशाला सुखी संसारासाठी काय टिप्स दिल्या होत्या, याचीही चर्चा होत आहे. (relation between Esha Deol and Bharat Takhtani)

 

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या घटस्फोटाच्या पार्श्वभुमीवर ईशा आणि भरत यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. याविषयी इंडियन एक्सप्रेस यांनी दिलेल्या वृत्तानुसार ईशाला तिच्या आईने म्हणजेच हेमा मालिनी यांनी लग्नाच्या वेळी काय सल्ले दिले होते, याची माहिती ईशाने स्वत:च त्या मुलाखतीत सांगितली होती.

स्टायलिश पद्धतीने साडी कशी नेसायची? सोनम कपूरच्या खास टिप्स

कोणतीही सर्वसामान्य आई आपल्या लेकीला जो सल्ला देईल, तोच सल्ला हेमाजींनी दिला होता. त्यांनी ईशाला सांगितलं होतं की एक चांगली सून होण्यासाठी तिने सकाळी तिच्या नवऱ्याच्या आधी उठावं, जास्त वेळ झोपून राहू नये. तसेच लवकर उठून तिच्या सासूची घरच्या कामामध्ये मदत करावी. घरातल्या नवनव्या गोष्टी शिकून घ्याव्या. तसेच हे सगळं करताना स्वत:च्या डान्स प्रॅक्टिसकडे मात्र दुर्लक्ष करू नये, असंही त्यांनी तिला बजावलं होतं. 

 

ईशा जेव्हा हे सांगत होती, तेव्हा त्या मुलाखतीत तिच्यासोबत भरतचीही उपस्थिती होती. त्यावेळी त्याने ईशाच्या या चांगल्या गुणांचं कौतूक केलं होतं. ती माझ्या आईची काळजी घेते, असं कबूल केलं होतं. भरत खूप फूडी आहे.

बैठ्या कामामुळे हिप्स फॅट, मांडीवरची चरबी वाढली? ३ उपाय- वाढलेली चरबी झरझर उतरेल 

त्यामुळे ईशा त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे अनेक पदार्थ करायला शिकली. तिला चहादेखील करता यायचा नाही. पण नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ मात्र ती आवर्जून करू लागली असं सांगून भरतने तिच्या प्रयत्नांचं कौतूक केलं होतं.  एवढं सगळं चांगलं सूरू असताना, ईशा- भरतच्या संसारात नेमकं बिनसलं काय? हाच प्रश्न आता तिच्या चाहत्यांना छळत आहे. 
 

Web Title: Esha Deol reveals about the advice given to her by her mother Hema Malini on her wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.