Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर २ दिवसांत पिवळी पडते-पान सडतात? १ ट्रिक, २ आठवडे ताजी-हिरवीगार राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:00 IST

Easy Way To Store Coriander (How To Keep Coriander Fresh For Long Time) : थंडीतच्या दिवसांत बाजारात मिळत असलेल्या कोथिंबीरीच्या जुड्या स्वस्त तसंच ताज्यासुद्धा असतात.

थंडीच्या दिवसांत हिरवीगार कोथिंबीर (Coriander) बाजारात बरीच दिसून येते. कोथिंबीर वरणात, भाज्यांमध्ये वापरली जाते. स्वंयपाक करताना काही पदार्थांमध्ये कोथिंबीर घातल्याशिवाय पदार्थ पूर्णच होत नाही.बाजारातून आणणेली ताजी कोथिंबीर १ ते २ दिवसांत पिवळी पडते, पानं सडून जातात अशी तक्रार अनेकांची असते. काही घरांमध्ये फ्रिज नसल्यामुळेही कोथिंबीर लवकर खराब होते. (Easy Way To Store Coriander At Home)

थंडीतच्या दिवसांत बाजारात मिळत असलेल्या कोथिंबीरीच्या जुड्या स्वस्त तसंच ताज्यासुद्धा असतात. एकदा आणलेली कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहावी यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे २ आठवडे कोथिंबीर ताजी राहील. जास्त मेहनत न करता,  जास्त खर्च करता तुम्ही हे उपाय करू शकता. (How To Store Coriander At Home For Long Time)

कोथिंबीरीत मॉईश्चर जास्त असते. जर तुम्ही ओलीच कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवली, हवेचा संपर्क व्यवस्थित येऊ दिला तर कोथिंबीरीची पानं सडू लागतात. तर जास्त कोरडेपणामुळे कोथिंबीरीची पानं पिवळी पडतात. म्हणून कोथिंबीर साठवताना  हवा आणि मॉईश्चरचं योग्य संतुलन राखणं गरजेचं असतं.

थंडीत करा उडुपीस्टाईल गरमागरम रस्सम; मऊ भातासोबत खा चवदार रस्सम-तोंडाला येईल चव

कोथिंबीर साठवण्याची पहिली पद्धत

सगळ्यात आधी कोथिंबीर व्यवस्थित धुवून घ्या.  त्यानंतर सुरीच्या साहाय्यानं देठं वेगळी करा. नंतर कोथिंबीर  जास्तवेळ पाण्यात भिजवून ठेवण्यापेक्षा हलक्या हातानं धुवून घ्या आणि एक स्वच्छ कापड घेऊन त्यावर पसरवा. ज्यामुळे त्यात अतिरिक्त पाणी राहणार नाही. नंतर एक कोरडा, स्वच्छ डबा घ्या. त्यावर सुती कापड पसरवून ठेवा. नंतर कोथिंबीर बारीक देठांसहीत त्यावर ठेवा आणि वरून हलकं कपडा झाका. डब्याचं झाकण पूर्ण बंद करू नका. जेणेकरून कोथिंबीरीला हवा लागेल. या पद्धतीनं ठेवल्यास कोथिंबीर आठवडाभर चांगली राहील.

ब्लाऊजला फॅन्सी लूक देणारे मागच्या गळ्याचे १० लेटेस्ट डिझाईन्स; साडीत स्टायलिश दिसाल

दुसरी पद्धत

 जर तुमच्याकडे मातीची भांडी असतील तर ही पद्धत वापरू शकता. माती मॉईश्चर संतुलित करण्यास मदत करते.  कोरडी कोथिंबीर कापडात लपेटून मातीच्या  भांड्यांवर ठेवा वरून हलकं झाकण ठेवा. या उपायानं कोथिंबीर जास्त वेळ टिकेल. कोथिंबीर कधीही ओल्या कापडात किंवा ओल्या पिशवीत ठेवू नका. जास्त ऊन असलेल्या ठिकाणी ठेवू नका.  कारण सतत हात लागल्यामुळे पानं लवकर खराब होऊ शकतात.

तिसरी पद्धत

कोथिंबीर स्वच्छ धुवून हलक्या हातानं, कापडानं पुसून घ्या. त्यानंतर कोथिंबीर एका स्वच्छ प्लास्टीकच्या पिशवीत  भरून  घ्या आणि पानांची बाजू आत राहू द्या.  देठांच्या बाजूला धाग्याच्या साहाय्यानं पिशवी बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. ज्यामुळे कोथिंबीर जास्त दिवस  चांगली राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Keep Coriander Fresh for Weeks: Simple Storage Tricks Revealed!

Web Summary : Coriander often wilts quickly. This article provides three simple methods to keep coriander fresh for up to two weeks. Proper washing, drying, and storage in cloth-lined containers or plastic bags maintain optimal moisture balance, preventing spoilage and preserving its vibrant green color.
टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.