Join us

डॉक्टरांचा इशारा! घरात असतील 'या' 4 वस्तू तर वाढतो शरीरात टॉक्सिन्स जमा होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:02 IST

Most Common Household Toxins: या गोष्टी दिसायला भलेही सामान्य असतील किंवा काही कामात उपयुक्त ठरत असतील, पण त्या हळूहळू शरीरात विषारी तत्व जमा करू लागतात.

Most Common Household Toxins: शरीर आतून नेहमीच स्वच्छ आणि निरोगी राहणं आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण शरीर जर आतून साफ नसेल तर त्याचा प्रभाव तब्येतीसोबतच त्वचेवर देखील दिसून येतो. पण कळत-नकळत आपणच अशा काही चुका करतो किंवा घरात अशा काही वस्तू ठेवतो ज्यामुळे शरीरात विषारी तत्व जमा होऊ शकतात. नचरोपॅथी डॉक्टर आणि रिसर्चर जेनिन बॉवरिंगने 4 अशाच गोष्टींबाबत सांगितलंय. त्यांनी यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितलं की, या गोष्टी दिसायला भलेही सामान्य असतील किंवा काही कामात उपयुक्त ठरत असतील, पण त्या हळूहळू शरीरात विषारी तत्व जमा करू लागतात.

घरात ठेवू नयेत या 4 गोष्टी

अ‍ॅल्युमिनियम फॉयल

डॉक्टर जेनिन सांगतात की, टिफिन भरताना वेगवेगळे पदार्थ किंवा चपात्या ठेवण्यासाठी बरेच लोक अ‍ॅल्युमिनियम फॉयलचा वापर करतात. पण या अ‍ॅल्युमिनियम फॉयलमुळे शरीरात हळूहळू अ‍ॅल्युमिनियमचं प्रमाण वाढतं. यानं खासकरून मेंदू आणि नर्वस सिस्टमवर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे अ‍ॅल्युमिनियम फॉयलऐवजी आपण बटर पेपर किंवा स्टीलच्या डब्याचा वापर करावा.

लॉन्ड्री सोप आणि सॉफ्टनर

कपड्यांना वास येऊ नये किंवा ते जरा सुगंधित रहावे म्हणून बरेच काही सुगंधित डिटर्जेंट आणि सॉफ्टनर वापरतात. शहरी भागात हे जास्त बघायला मिळतं. पण या गोष्टींमध्ये आर्टिफिशियल गंध आणि केमिकल्सही असतात. जे त्वचेवर खाज, अ‍ॅलर्जी किंवा डोकेदुखीचं कारण ठरू शकतात. त्यामुळे एक्सपर्ट नेहमीच नॅचरल किंवा हर्बल डिटर्जेंटचा वापर करण्याचा सल्ला देतात.

सेंटेड मेणबत्त्या आणि एअर फ्रेशनर

आता दिवाळीचा सीझन आहे. बरेच लोक घरात सेंटेट मेणबत्त्या आणि एअर फ्रेशनरचा वापर करतात. जेणेकरून घर सुगंधित रहावं. यानं चांगलं तर वाटतं, पण यातील सिंथेटिक फ्रेग्रेन्स हार्मोनल असंतुलन आणि श्वासासंबंधी समस्यांचा धोका वाढवू शकतात. डॉक्टर याऐवजी एसेंशिअल ऑइल डिफ्यूजरचा वापर करण्याचा सल्ला देतात.

केमिकलयुक्त क्लीनिंग प्रॉडक्ट्स

पुढे डॉक्टर जेनिन बॉवरिंग सांगतात की, घरातील वेगवेगळ्या गोष्टींची स्वच्छता करण्यासाठी बाजारात कितीतरी केमिकलयुक्त क्लीनिंग प्रॉडक्ट्स मिळतात. या प्रॉडक्ट्स अनेक टॉक्सिक केमिकल्स असतात, जे त्वचेचं नुकसान करू शकतात. अशात या प्रॉडक्ट्सऐवजी आपण लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोड्यानं स्वच्छताकरू शकता. 

एकंदर काय तर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, शरीरात विषारी तत्व जाऊ द्यायचे नसतील, त्वचेचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर काही नुकसानकारक वस्तू घरात ठेवू नयेत. स्वच्छतेसाठी नॅचरल गोष्टींचा वापर करता येऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor warns: These 4 household items increase toxins in body.

Web Summary : Doctor warns against aluminum foil, scented detergents, air fresheners, and chemical cleaners. These items release toxins, causing allergies, hormonal imbalance, and nervous system damage. Opt for natural alternatives like baking soda.
टॅग्स :स्वच्छता टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य