Lokmat Sakhi >Social Viral > कॅन्सरमुळे काढावे लागले १३ अवयव, तरी पठ्ठीने हार मानली नाही.. पाहा रेबेकाची प्रेरणादायी गोष्ट!!

कॅन्सरमुळे काढावे लागले १३ अवयव, तरी पठ्ठीने हार मानली नाही.. पाहा रेबेकाची प्रेरणादायी गोष्ट!!

doctor removed her 13 organs due to cancer, but she didn't give up.. Watch Rebecca's inspiring story!! : सलाम या महिलेच्या जिद्दीला, कॅन्सरमुळे काढावे लागले अवयव. फक्त एक नाही तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 13:16 IST2025-05-27T13:15:35+5:302025-05-27T13:16:35+5:30

doctor removed her 13 organs due to cancer, but she didn't give up.. Watch Rebecca's inspiring story!! : सलाम या महिलेच्या जिद्दीला, कॅन्सरमुळे काढावे लागले अवयव. फक्त एक नाही तर...

doctor removed her 13 organs due to cancer, but she didn't give up.. Watch Rebecca's inspiring story!! | कॅन्सरमुळे काढावे लागले १३ अवयव, तरी पठ्ठीने हार मानली नाही.. पाहा रेबेकाची प्रेरणादायी गोष्ट!!

कॅन्सरमुळे काढावे लागले १३ अवयव, तरी पठ्ठीने हार मानली नाही.. पाहा रेबेकाची प्रेरणादायी गोष्ट!!

जगभरात कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनकच आहे. कर्करोगाने पिडीत असलेल्या व्यक्तीची फक्त शारीरिक स्थिती खालावत नाही त्याची मानसिक स्थितीही खालावते. (doctor removed her 13 organs due to cancer, but she didn't give up.. Watch Rebecca's inspiring story!!)फक्त पिडीतच नाही तर परिवारातील प्रत्येक सदस्य घाबरुन जातो. त्यामुळे कॅन्सर झालेल्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञ विविध कॅम्प घेत असतात. ज्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळतो. कॅन्सरमध्येही अनेक प्रकार आहेत. जवळपास सगळ्याच अवयवांचा कॅन्सर होऊ शकतो. WHO ने सांगितल्या सरासरीनुसार, २०२२ मध्ये जवळपास २० दशलक्ष नव्या केस फाईल झाल्या आणि कॅन्सरमुळे ९.७ दशलक्ष मृत्यू झाले. 

कॅन्सरसाठीचे उपचार फारच महाग असतात. औषधे, केमो आणि इतरही अनेक गोष्टी असतात. अनेक वर्ष या लढ्यात जातातच. कॅन्सरने पिडीत असलेल्यांना कॅन्सर योद्धे असे संबोधले जाते. कारण हा काही साधा आजार नाही. फार धीर ठेवावा लागतो, संयम ठेवावा लागतो. अशीच एक योद्धा म्हणजे रेबेका हिंद. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या रेबेकाला वयाच्या ३९ व्या वर्षी फार कठीण ट्रिटमेंटमधून जावे लागले. (doctor removed her 13 organs due to cancer, but she didn't give up.. Watch Rebecca's inspiring story!!)लाखात एकाला होणारा एक कॅन्सर प्रकार रेबेकाला झाला आणि तिला बऱ्याच महाग ट्रिटमेंट कराव्या लागल्या. मात्र हार न मानता तिने सगळे सहन केले. सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा या एका तत्वाचा वापर करत तिने कायम हसत मुखाने ट्रिटमेंट्स करुन घेतल्या. रेबेकाचे एकूण १३ अवयव काढावे लागले.

रेबेकाला स्यूडोमिक्सोमा पेरिटोनी(पीएमपी) नावाचा एक फार दुर्मिळ असा कॅन्सर झाला. हा एका अवयवापर्यंत सीमित राहत नाही शरीरभर पसरत जातो. वेळीच डॉक्टरांना या कॅन्सरच्या फैलावाबद्दल कळले तर तो कमी त्रासात काढता येतो. मात्र रेबेकाला कॅन्सर झाल्याचे कळण्याआधीच तो शरीरभर पसरला होतो. रेबेकाला आधी अन्नातून विषबाधा झाल्यासारखे वाटले मात्र सलग आठ आठवडे त्रास होत राहिल्यावर तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेव्हा तिला कॅन्सर असल्याचे कळले. एप्रिल २०१९ मध्ये रेबेकाचे एक मोठे ऑपरेशन झाले. त्यात तिच्या शरीरातून तिचे अपेंडिक्स, नाभी आणि काही ग्रंथी काढल्या. नंतर नोव्हेंबरमध्ये आणखी एक ऑपरेशन करावे लागले आणि त्यात पित्ताशयाची पिशवी, स्प्लीन, मोठे आतडे व गर्भाशय काढले. असे करत तिचे १३ अवयव काढले गेले. 

रेबेका हिंदने एका मुलाखतीत सांगितले होते की माझे आयुष्य एका रोलरकोस्टरसारखे आहे. भीती वाटतेच असे आजार झाल्यावर काहीच हातात राहत नाही. मात्र कायम सकारात्मक राहावे, मला त्याचाच फायदा झाला. रेबेकाचे आयुष्य सगळ्यांसाठीच फार प्रेरणादायी आहे.            

Web Title: doctor removed her 13 organs due to cancer, but she didn't give up.. Watch Rebecca's inspiring story!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.